दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न

दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न eighth commemoration ceremony of Dada Maharaj Manmadkar was held

पंढरपूर /प्रतिनिधी – येथील वै.विद्यावाचस्पती डॉ. दादा महाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच झाला.येथील भगवानराव मनमाडकर यांच्यावतीने एकदिवसीय नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

   वारकरी संप्रदायातील अभ्यासू संत म्हणून विद्यावाचस्पती डॉ.कै.दादा महाराज मनमाडकर यांच्याकडे पाहिले जाते. यानिमित्ताने परंपरेप्रमाणे ह.भ.प.महादेव महाराज आडसुळ आणि ह.भ.प. निरंजन महाराज मनमाडकर यांच्या प्रवचनानंतर महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यापूर्वी सुदर्शन कुंभार , शिवांजली आदलिंगे आणि शुभांगीताई मनमाडकर यांची भजन सेवा झाली. वै.दादामहाराज मनमाडकर यांचे असंख्य भक्तगणांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आशीर्वाद घेतले. 

 यानिमित्ताने आमदार प्रशांत परिचारक ,प्रणव परिचारक ,रोहन परिचारक,प्रणितीताई भालके , विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदीसह वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींसह मान्यवरांनी येऊन दादा महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. 

मनमाडकर कुटुंबीयांच्यावतीने दादा महाराज यांचे बंधू भगवान मनमाडकर आणि पुतणे धनंजय मनमाडकर यांच्यावतीने महाप्रसाद वाटप आला.

दादा महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी कोरोनामुळे हरिनाम सप्ताह न करता. साधेपणाने कोरोना विषयक शासनाचे सर्व नियम पाळून हरिनामाच्या जयघोषात व दादा महाराजांचे स्मरण करून पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न झाला.

दादामहाराज मनमाडकर यांचे पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.निरंजन महाराज मनमाडकर प्रवचन करताना

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: