पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड, नॉन कोविड सेवा अविरतपणे सुरु

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड, नॉन कोविड सेवा अविरतपणे सुरु Covid, non-covid services started uninterruptedly at Pandharpur Sub-District Hospital
  पंढरपूर दि. 02 :- राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोविड -19 आजाराची साथ सुरु आहे. कोरोना साथीच्या कालावधीत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड-19 तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही रुग्ण सेवा अवितरपणे सुरु असून कोरोना बाधित रुग्ण तसेच इतर आजाराचे रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार सुरु असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.अरविद गिराम यांनी दिली.

   उपजिल्हा रुग्णालयात माहे एप्रिल ते जुलै 2021 या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील तसेच विविध विभागातून आलेल्या रुग्णांना सेवा देण्यात आली. यामध्ये नवजात अतिदक्षता विभागात 62 नवजात बालकांवर उपचार करण्यात आले. पुनर्वसन केंद्रातुन आठ बालकांना पोषण सेवा देण्यात आल्या. डायलेसीस विभागात 572 रुग्ण , प्रसुती विभागात 310 प्रसुती करण्यात आल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत 265 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 586 एचआयव्ही संसर्गीत रुग्णांचे लसीकरण करण्यात आले , 41 रुग्णांवर टीबीचे उपचार सुरु करण्यात आल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.

  माहे एप्रिल ते जुलै 2021 या कालावधीत 4 हजार 390 जणांची कोविड आरटीपीसीआर तपासणी व 8 हजार 583 हुन अधिक संशयित रुग्णांची रॅपीड ॲन्टीजेनची तपासणी करण्यात आली.कोरोना संसर्गाच्या कालावधीत 2 हजार 500 हुन अधिक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले असून,कोविड रुग्णांच्या उपचारा साठी डॉ.सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. उपजिल्हा रुग्णालयास उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले तसेच तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच आवश्यक ते सहकार्य मिळत असल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड-19 तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग असून नाँन कोवीड रूग्णांनी न घाबरता उपचारासाठी यावे असे आवाहन डॉ गिराम,डॉ. सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: