आरोपीचा शोध घेवून पाठलाग करून लातूर जिल्हयात केली अटक – पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेची कामगिरी

आरोपीचा शोध घेवून पाठलाग करून लातूर जिल्हयात केली अटक – पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेची कामगिरी Accused tracked down and arrested in Latur district – Performance of Pandharpur Rural Police Thane

पंढरपूर -पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेचे हदीतील स्वामी समर्थ मठ,जुना अकलुज रोड , शिरढोण ता.पंढरपुर जि.सोलापुर येथील रोडचे काम चालु आहे . सदर रोडचे कामावरती मुरूम भरणेकामी चालु असलेले टिपर पैकी जालनेकर अँन्ड सन्स या कंपनीमधील भारत बॅन्ज कंपनीचा अंदाजे ३० लाख रूपये किमतीचा १० टायर टिपर नं.एम.एच. २३ ए.यु .५५७९ यावरील मध्यप्रदेश राज्यातील चालक शिवकुमार लोलर केवट रा.मायापुर टु लौआर सडक , प्रायमरी विदयालय कुसेडा के पास , ग्राम – कुसेडा पोस्ट – खुटेली , तालुका – बहरी , सिदी , राज्य – मध्यप्रदेश याने टिपर मालकाने पगार न दिल्याचे कारणावरून त्याचे ताब्यातील वर नमुद टिपर हा दि.०२/०८/ २०२१ रोजी १३:२० वाचे सुमारास मालकाचे संमती वाचुन मुद्याम लबाडीने चोरून नेला आहे वगैरे बाबत पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेस गु.र.नं . २९२/२०२१ भा.द.वी.क.३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

    पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम ,पंढरपूर विभाग पंढरपूर यांचे आदेशाने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सदर गुन्हयातील गेला माल टिपर व त्यावरील चालकाचा शोधा घेणेकामी सपोफौ मारूती दिवसे , पोहेकॉ सुभाष शेंडगे, पोना सुनिल मोरे , पोकॉ रशीद मुलाणी,चापोहेकॉ मनोज कुंभार यांचे एक तपास पथक तयार करून त्यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून आदेश दिल्याने तपास पथकातील पोना सुनिल मोरे यांनी आरोपीचा मोबाईल नंबर हस्तगत करून सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ अनवर आत्तार यांचे मदतीने आरोपीचा शोध घेवुन त्यांचा पाठलाग करून लातुर जिल्हयातील औंसा टोल नाक्या जवळ आरोपीसह चोरीस गेलेला भारत बॅन्ज कंपनीचा १० टायर टिपर नं.एम.एच.२३ ए.यु .५९ ७९ हा ताब्यात घेण्यात आला . आरोपी व गुन्हयातील गेलेल्या माल टिपर पर्यंत पोहचण्या साठी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे तपास पथक टिमने व सायबर पोलीस ठाणेचे मदतीने कौशल्या पुर्ण तपासाचे नियोजन करून वरील आरोपीस दि.०३/०८/ २०२१ रोजी अटक करून त्याचे हातात बेडया ठोकल्या आहेत.या आरोपीस दि.०३/०८/२०२१ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी,पंढरपूर कोर्ट यांचे समक्ष हजर करून त्यांची दि .०४/०८/ २०२१ पर्यत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे . 

गुन्हयाचा पुढील तपास सपोफौ मारूती दिवसे हे करीत आहेत . या गुन्हयाचे तपासकामी सपोफौ मारूती दिवसे ,पोहेकॉ सुभाष शेंडगे, पोना सुनिल मोरे , पोकॉ रशीद मुलाणी,वापोहेकॉ मनोज कुंभार पोकॉ अनवर आत्तार ने. सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी मदत केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: