हिल लाईन येथे दोन जोडप्यांवर हल्ला करून अत्याचार

हिल लाईन जि.ठाणे येथे दोन जोडप्यांवर हल्ला करून अत्याचार केलेल्या घटनेची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश Torture by attacking two couples at Hill Line
 मुंबई दि.०४ : अंबरनाथ येथील नेवली व हिल लाईन येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोन जोडप्यांवर काही आरोपीने हल्ला करून केलेल्या अत्याचार  घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश देखील डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्त श्री मोहिते यांना दिले आहेत. 

    यात सदरील घटनेतील चौघे रविवारी सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास मलंग गडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. या ठिकाणी असलेल्या समाजकंटकांनी मुलींची छेडछेड करण्यास सुरुवात केली व त्या मुलींसोबत उपस्थित असलेल्या दोन तरुणांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटून हे तरुण नेवली पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाणे येथून त्यांना मेडिकल करण्यासाठी पत्र देण्यात आले होते परंतु तेथे सदरील तरुण तेथे न जात घरी गेले व त्यांनी सोशल मीडियावर या बाबतची पोस्ट व्हायरल केली. यानंतर नेवली पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी त्यांना संपर्क करून गुन्हा नोंद करून घेतला असल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी विचारल्यानंतर दिली. 

   सदरील घटनेत काही त्रुटी असल्याचे सांगत असताना डॉ.गोऱ्हे यांनी मेडिकल रिपोर्टला पीडितांना पाठवत असताना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना का पाठवले नाही ? अशा घटनेत पीडितेसोबत मेडिकल करण्यासाठी पोलीस अधिकारी सोबत पाठविण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी श्री मोहिते यांना केली.  

    या घटनेतील आरोपींना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही त्यामुळे ज्या सुजाण नागरिकांना आरोपीबद्दल माहिती असेल त्यांनी ठाणे पोलीस उपायुक्त श्री मोहिते यांच्याकडे देण्यात यावे त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

 दुर्गाडी किल्ला,मलंग गडच्या पायथ्याशी किंवा सदरील परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी जात असतात.त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी दिली.यासाठी निधीची आवश्यकता असेल तर ते स्थानिक आमदार निधीतून देण्याची तयारी डॉ.गोऱ्हे यांनी दाखवली. या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाणे आणि कंट्रोल रूममध्ये ठेवण्याची सूचना त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: