नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन मध्ये ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो चा कार्यक्रम संपन्न

नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन मध्ये ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो चा कार्यक्रम संपन्न event of Global Organic Expo was held at New Maharashtra Sadan in New Delhi
नवी दिल्ली - मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या न्यू महाराष्ट्र सदन या स्थळी 'ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो'चे आयोजन करण्यात आलेला कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन झाले. या कार्यक्रमात भारतातील १८ राज्यातून १०० हुन अधिक सेंद्रिय खाद्य उत्पादक चे मालक,डायरेक्टर, सेक्रेटरी, प्रोफेसर, विद्यार्थी, न्युट्रिशनिस्ट व शेतकरी आले होते. त्यांनी स्वतःचे मुद्दे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मांडले.यात प्रामुख्याने सेंद्रिय शेती, त्याच्याशी संबंधित असलेल्या समस्या मांडताना केंद्र सरकारने त्या समस्या सोडवण्या साठी कशा प्रकारे मदत करायला हवी हे सांगितले. मानवी आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय पदार्थ आणि त्याचे उत्पादन तसेच मार्केटिंग यावर विशेष भर देण्यात आला. १ लाखापेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय खाद्याची शेती करत आहेत आणि १००० पेक्षा जास्त सेंद्रिय उत्पादनांच्या कंपन्या मार्केटिंग आणि प्रोसेसिंग युनिटच्या स्वरूपात स्थापन झालेल्या आहेत.

या कार्यक्रमाला आलेल्या वेगवेगळ्या राज्यातील तज्ञांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली आणि केंद्र सरकारकडून त्यांना काय अपेक्षित आहे ते आठवले यांच्यासमोर नमूद केले.राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही कृषी क्षेत्रासाठी सरकार कशा प्रकारे प्रयत्न करीत आहे आणि नव्याने केलेल्या कृषी कायद्याचा शेतकऱ्यांना किती आणि कसा फायदा होणार आहे ते सांगितले. नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्यासाठी एक मुक्त अशी बाजारपेठ मिळाल्याने शेतकरी आनंदी आहेत असेही ते म्हणाले.केंद्र सरकारने जे तीन नावे कृषी कायदे केलेले आहेत ते देशातील कृषी उद्योग आणि शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतीचा विकास ही होऊ शकेल असे प्रतिपादन केले .यावेळी त्यांनी मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती किती आवश्यक आहे याचेही महत्व पटवून दिले.

   या कार्यक्रमाचे आयोजक नविन लादे, मनोज मिश्रा,नाजनीन अंसारी यांनी केले असून या भव्य कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आयकॉनेक्स कंपनीचे संचालक राजीव बंसल, अभिमन्यू सिंग यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विम्मी चौधरी यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रविण गौड,सीमा यादव,दिपिका घाडी, आशिष मिश्रा व दिनेश तिवारी यांनी प्रयत्न केले . 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: