लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने पाण्याची टाकी प्रदान

लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने पाण्याची टाकी प्रदान Water tank provided on behalf of Lions Club of Solapur Twin City

सोलापूर – लायन्स क्लब आँफ सोलापूर ट्विन सिटीच्यावतीने ज्ञानसंपदा प्रशाला नवीन आरटीओ ऑफिस शेजारी विजापूर रोड सोलापूर येथे लायन कविता औदप्पा पुजारी यांच्या वाढ दिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 1000 लिटरची पाण्याची टाकी गटशिक्षण विस्तार आधिकारी व लायन्स क्लब रिजन वन झोन 3 चे उपविभागीय सभापती अशोक भांजे यांच्या हस्ते शाळेला भेट देण्यात आली. यावेळी लायन्स क्लब ट्विन सिटी चे प्रथम उपाध्यक्ष श्री हिराचंद, सचिव अभियंता सागर पुकाळे ,नागेश बुगडे,ममता बुगडे,विश्वनाथ स्वामी लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी औदप्पा पुजारी , कविता पुजारी , राजेश परसगोंड , ज्ञानसंपदा प्रशालेचे संस्था चालक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजीव देसाई यांनी करून लायन्स क्लब या इंटरनॅशनल संघटनेबद्दल माहिती दिली . आभार प्रदर्शन सागर पुकळे यांनी केले. या कार्यक्रमानंतर कविता औदप्पा पुजारी यांचा सत्कार करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: