कोठेवाडी येथील भगिनींना महाराष्ट्र शासनाने दिली राखीची ही भेट

कोठेवाडी येथील भगिनींना महाराष्ट्र शासनाची ऐतिहासिक राखीची अनोखी भेट This gift of Rakhi was given by Government of Maharashtra to sisters of Kothewadi

पुणे,७ आँगस्ट: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील बारा आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा अशी मागणी केली. तत्काल मागणी मान्य करत गृहमंत्र्यांनी कोठेवाडी ग्रामस्थांनी योग्य त्या नियमानुसार त्यांना शस्त्र परवाने द्या ते यांना द्या अशा सुचना देखील दिल्या. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, नगरचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील, डी.वाय.एस.पी.सुदर्शन मुंडे उपस्थित होते.

दरोडे व महिलांवरील अत्याचाराविरोधात ग्रामस्थांना योग्य तो शस्त्र परवाना देण्याचा निर्णय
   ग्रामस्थांसमावेत झालेल्या या बैठकीत डॉ.नीलमताई गोऱ्हे Nilamtai Gorhe यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने गावात संरक्षण वाढवावे, गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नजर असावी यासाठी सीसीटीव्ही दुरूस्ती करून द्यावेत, ग्रामरक्षक दलामार्फत समन्वय करून द्यावे जेणेकरून काही अडचणी असतील तर पोलीस आणि सरकारचे सहाय्यता त्यांना मिळू शकेल. या बैठकीत महिला अत्याचाराच्या प्रश्नावर भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा या हाकेला परवाना देण्याचा एतिहासिक निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला हे राखीपेक्षा अनोखी भेट शासनाने दिली त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, uddhav thakare, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, dilip walse patil यांचेही डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: