प्रशासनाने केले बंदचे आवाहन, त्यावरून प्रशासन व्यापाऱ्यांचा संघर्ष अटळ

प्रशासनाने केले बंदचे आवाहन, त्यावरून प्रशासन आणि व्यापाऱ्यांचा संघर्ष अटळ The administration called for a shutdown, which inevitably led to a clash between the administration and traders
कुर्डुवाडी / राहुल धोका - माढा येथील तहसिल कार्यालयात प्रशासन ,व्यापारी यांच्या दि.१३ रोजी झालेल्या चर्चेत दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाने अवाहन करण्यात आले मात्र व्यापारी वर्गाने दुकाने बंद न ठेवण्याचा मानस व्यक्त केला त्यामुळे व्यापारी व प्रशासन असा संघर्ष काही ठिकाणी होणार हे निश्चित आहे. माढा तालुक्यामध्ये व्यापार व प्रशासन यांच्यात चर्चा झाली. उपविभागीय अधिकारी ज्योती कदम,तहसीलदार राजेश चव्हाण, पोलिस निरिक्षक चिमणाजी केंद्रे , आरोग्य निरक्षक तुकाराम पायगण सह अधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी व्यापारी असोसिएशन माढा यांनी विरोध दर्शविला आहे .व्यापारी असोसिएशन माढा आज अखेर प्रशासनास कोरोना कालावधी गेले २ वर्षापासून सहकार्य करीत आलेली आहे मात्र सतत प्रशासना मार्फत आमचेवर अन्याय केलेला आहे . प्रशासनाचा आदेश हाच व्यापार्यांवर नेहमीच गदा आणत आहे . बँकेचा तगादा , इतर व्यापाऱ्यांची देणी , खाजगी सावकराचा तगादा त्याचबरोबर त्यावर असणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वातून मार्ग काढत व्यापार करून कसेबसे जीवन जगत आहे.कोरोनावर शासनाने योग्य ती उपाय योजना करून नागरिकांवर निर्बंध लादून कारवाई करणे गरजेचे आहे तसे न होता प्रशासन व्यापारी वर्गाची दुकान बंद करून चुकीची कारवाई करीत आहे .शासनाने आज अखेर कोणतेही सहकार्य अथवा आर्थिक मदत ही व्यापारी वर्गास केलेली नाही . उलटपक्षी व्यापारी वर्ग बँकेची देणी व इतर शासकीय कर स्वरूपात शासनास वेळेत भरून सहकार्य करीत आहे तरीही व्यापारी वर्गावर शासन कारवाई करण्याची धमकी देवून त्यांच्यावर अन्याय करीत आहे . व्यापारी वर्ग अशा आदेशांना पुरा कंटाळून गेलेला आहे . याचाच एक भाग म्हणून शासनाने दि.०४/०८/ २०२१ रोजीच्या आदेशाचा निषेध करून आम्ही व्यापारी वर्ग कोरोनाचे निर्बध पाळून आमचे व्यवसाय सुरू ठेवणार आहोत व होणाऱ्या नुकसानीस व परिणामास शासन सर्वस्वी जबाबदार राहणार आहे . या उपर जर प्रशासनाने कार्यवाही करण्याचा व्यापारी वर्गावर प्रयत्न केला तर सर्व व्यापारी श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक माढा येथे ठिय्या आंदोलन करून आपल्या आदेशाचा जाहीर निषेध करतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदन सचिव अँड.वैभव काशिद, उपाध्यक्ष हिम्मत जाधव खजिनदार महेंद्र शहा अध्यक्ष दिनेश जगदाळे यांनी दिले आहे.

 कुर्डुवाडी माढा मोबाईल रिटेलर असोसिएशन, अध्यक्ष किशोर गवळी,राम बागल,पंडीत आवताडे ,विक्रंत भालाणी, कापड असोसिएशन अध्यक्ष विकास संचेती, प्रफुल्ल जवंजाळ,पवन शर्मा, माढा येथील व्यापारी असोशियशन दिनेश जगदळे, टेंभुर्णी सराफ असोशियशन माढा तालुका अध्यक्ष विजय कोठारी , सराफ संघटना अध्यक्ष महेश कोठारी, इलेक्ट्राॅनिक व्यापार अध्यक्ष मदन शहा,कापड असोसिएशन पपेश पाटील, गोरख देशमुख यांच्यासह व्यापारी वर्गाने बंद चा निषेध करुन व्यापार बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: