संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 57 प्रकरणे मंजूर Sanjay Gandhi Niradhar, 57 cases sanctioned under Shravanbal Seva Yojana
पंढरपूर ,दि 12/08/2021/डाँ अंकिता शहा :- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 57 प्रकरणे समीतीच्या सभेत मंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 31 प्रकरणे व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 26 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
राज्यशासनामार्फत संजय गांधी निराधार योजनेत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिक तसेच श्रावणबाळ योजनेत 65 वर्षावरील वृध्द निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा ,असे आवाहनही तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले.
समितीच्या सभेत ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यांनी बँक पास बुकची छायाकिंत प्रत व फोटो तात्काळ तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जमा करावेत असेही तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.
Like this:
Like Loading...