संतपेठ प्रभाग क्रमांक ८ मधील सिमेंट काँक्रिट रस्तांचे आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भूमिपूजन

संतपेठ प्रभाग क्रमांक ८ मधील सिमेंट काँक्रिट रस्तांचे आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भूमिपूजन Bhumi Pujan of Cement Concrete Roads by MLA Prashant Paricharak
        पंढरपूर /प्रतिनिधी - पंढरपूर शहरातील संतपेठ भागातील प्रभाग क्र.८ मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे येथे दलित वस्ती सुधार योजने मधून रस्त्याच्या कामाचा कॉक्रेटीकरण भूमिपूजन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधनाताई भोसले, उपनगराध्या श्वेता डोंबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

याप्रसंगी संतपेठ सुडके गल्ली रस्ता ४९ लाख ५० हजार, बडवे चर रस्ता २३ लाख,डी राज सर्वगोड घराजवळील ११ लाख व ३२ खोल्या मधील ७३ लाख रुपये खर्च करुन येथील रस्तांची कामे नगरसेवक संजय निंबाळकर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

  सदर क्रार्यक्रमासाठी नगरसेवक वामन बंदपट्टे, इब्राहिम बोहरी,गुरुदास अभ्यंकर,अनिल अभंगराव, बसवेश्वर देवमारे, विवेक परदेशी, तमा घोडके, राजू सर्वगोड, डि राज सर्वगोड, अमोल डोके, विक्रम शिरसट,इकबाल बागवान, सन्मित् ग्रुपचे विदुल अधटराव,सिकंदर बागवान, शकुर बागवान, सरदार शेख, रहिम शेख,उमेश सर्वगोड, संतोष सर्वगोड,संजय आडगळे, भिमराव वाघमारे, औदुबर माळी,दत्ता खिलारे,सुरेश तूपसौंदर,प्रशांत धुमाळ यांच्या उपस्थितीत झाला. 

   या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ज्योतिराम लिंगे,धनंजय निंबाळकर,अमोल सासवडकर, अक्षय निंबाळकर, सतिश सासवडकर,भैय्या दहिवडे, लक्ष्मण सासवडकर, आणणा धोत्रे, बापू उंडाळे यांनी प्रयत्न केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: