परिणामी ओबीसीच्या न्याय हक्कांवर गदा – अन्यथा काँग्रेस आंदोलन करणार

परिणामी ओबीसीच्या न्याय हक्कांवर गदा – अन्यथा काँग्रेस आंदोलन करणार As a result, OBC’s right to justice is hammered – otherwise Congress will agitate
 पंढरपूर, 12/08/2021 - केंद्रातील सरकार हे उजव्या विचारसरणीचे असून मागासवर्गीयांच्या प्रगती व सत्तेशी यात त्यांना घेणे देणे नाही. ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजप सरकारच्या मातृ संस्थेचा छुपा अजेंडा आहे तोच आड पडद्याने राबवला जात आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला राजकारणातील आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारत सरकारकडे तात्कालीन सरकार काँग्रेस पक्षाने तयार केलेला 2007 ते 2014 पर्यंत ओबीसी च्या बाबतीतील एम्पिरिकल डाटा तयार असतानाही सुप्रीम कोर्टाच्या कामाकरता पुरविला जात नाही किंबहुना टाळाटाळ केली जाते. परिणामी ओबीसीच्या न्याय हक्कावर गदा आलेली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा अन्याय कधीही सहन करू शकणार नाही तेव्हा ताबडतोब संबंधित एम्पिरिकल डाटा माननीय सुप्रीम कोर्टाला देण्याची व्यवस्था न झाल्यास काँग्रेसचे नेते राहुल गांधी,माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलने छेडण्यात येणार आहे .

    यात 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत केंद्र सरकारने ही माहिती सुप्रीम कोर्टात उपलब्ध केली नाही तर दिल्लीतील जंतरमंतर वरती सुमारे एक लाख ओबीसी समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. 

 आंदोलनाचा दुसरा टप्पा राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाचा तिसरा टप्पा राज्यभरातील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात जलसमाधी घेऊन आंदोलन करणार आहेत.

 आंदोलनाचा चौथा टप्पा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने राज्यभरातील ओबीसी कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. 

 या आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांच्यावतीने राष्ट्रपती भारत सरकार यांना प्रांत अधिकारी यांच्या हस्ते सादर करण्यात आले .

  यावेळी पंढरपूर शहराध्यक्ष काँग्रेस कमिटीचे राजेश भादुले, जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अश्पाक सय्यद , युवक काँग्रेस उपाध्यक्ष संदीप शिंदे,कृष्णा कवडे,ब्राह्मण सेल जिल्हाध्यक्ष द बडवे, माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर, देवानंद इरकल,नागेश अधटराव,अमीत अवघडे,तेली समाज अध्यक्ष मधुकर फलटणकर,शहर सरचिटणीस बाळासाहेब आसबे, तसेच या कार्यक्रमास काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आभार काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष राजू उराडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: