लायन्स क्लब पंढरपूर मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

लायन्स क्लब पंढरपूर मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न Cataract surgery camp conducted through Lions Club Pandharpur
  पंढरपूर - पंढरपूरमधे लायन्स क्लब पंढरपूरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते.लायन सदस्य डॉ.आकाश रेपाळ नेत्र रुग्णालय व फेको सेंटर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. 

  लायन संस्थेचे माजी प्रांताध्यक्ष MJF सी.एम. पारेख यांच्या जन्म दिवसानिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराची मेगा ऍक्टिव्हिटी घेण्यात आली.

  या शिबिरासाठी कोरोनासाठी केलेल्या नियमांचे पालन करुन शिबीरासाठी नावनोंदणी केलेल्या नागरिकांची टप्याटप्याने वेळ देऊन त्यांची तपासणी करण्यात आली आणि मोतीबिंदू परिपक्व झाला की नाही हे तपासून,रक्ताच्या तपासण्या व फिजिकल फिटनेस पाहण्यात आले. १०९ पेशंटची तपासणी करण्यात आली त्यामधून ४५ रुग्ण ऑपरेशनसाठी योग्य ठरले.

 रुग्णांची फिजिकल फिटनेस तपासणी लायन्स क्लब सदस्य डॉ.अमित पावले यांनी मोफत करून दिली.रक्ताच्या तपासण्या डॉ. विनायक जोशी यांनी अत्यल्प शुल्क आकारून करून दिल्या. 

     उद्घाटनावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी कोरोनाच्या अत्यंत वाईट काळात बरेचसे व्यवसाय अजुनही सुरळीत चालु नाहीत अशा परिस्थितीत अंधत्वाकडे झुकलेल्या रुग्णांना दृष्टी देण्याचे उदात्त कार्य लायन्स क्लबने केल्याबाबत समाधान व्यक्त केले आणि यापुढील सामाजिक कार्यासाठी लायन्स क्लबच्या सदैव पाठीशी राहणार आहे असे सांगितले.

      यानंतर क्रमाक्रमाने ४५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली व ऑपरेशन नंतरची आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. लायन्स क्लबची ही सिग्नेचर ऍक्टिव्हिटी ठरवण्यात आली असल्याचे लायन्स क्लबचे अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले . 

लायन्स क्लब पंढरपूर या वर्षामध्ये डोळ्यांच्या विकारा संदर्भातील विविध उपक्रम राबवणार असून हे उपक्रम दर महिन्याला रेपाळ नेत्र रुग्णालयामध्ये राबवण्यात येणार असल्याचे डॉ आकाश रेपाळ सांगितले.

   प्रकल्प प्रमुख राजीव कटेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सेक्रेटरी ललिता कोळवले,उपाध्यक्षा डॉ.मृणाल गांधी, डॉ.दिपाली रेपाळ यांनी परिश्रम घेतले. या प्रकल्पासाठी रोहन लॅबचे डॉ.विनायक जोशी, अँडव्होकेट भारत वाघुले, मुन्नागिर गोसावी, मंदार केसकर, सुरेखा कुलकर्णी, ईम्रान मुल्ला, डॉ. प्रांजली शिंदे,डॉ.रोहित शिंदे,प्रसाद रेपाळ,सौ विद्या रेपाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिपाली रेपाळ यांनी केले.आभार मंदार केसकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: