पहिल्याच दिवशी 195 नागरिकांची नेत्र तपासणी तर 42 रूग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी पात्र

पहिल्याच दिवशी 195 नागरिकांची नेत्रतपासणी तर 42 रूग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र On first day ,195 patients underwent eye examination and 42 patients underwent cataract surgery

पंढरपूर,12/08/2021- राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती, सोलापूर व पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर (लेन्स बसवून) व महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबीराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले आणि त्यांच्या सर्व स्टाफच्या हस्ते पार पडले .

या निमित्ताने स्वर्गीय.सुधाकर आजोबांची आठवण म्हणून आरोग्य केंद्राच्या बाहेर एक झाड लावले.

 या शिबिरांमध्ये 195 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यामध्ये 42 रूग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पात्र ठरले आहेत. लवकरच या पात्र रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.याप्रसंगी कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्याप्रति लोकांचे असलेले प्रेम आणि आठवण बघून मन भारावले. या शिबिरातून सर्वार्थाने कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या संस्कारानुसार समाजासह लोकांना दृष्टी देण्याचे काम होत आहे. 

यावेळी वैद्यकीय अधिकारी गादेगाव च्या डॉ. तांबोळी मॅडम, पं.स.मा.सभापती अर्चनाताई व्हरगर, जि.प सदस्य नाना गोसावी, मा.सभापती भगवानराव चौगुले, पोपट रेडे, पां.स. सा.कारखाना संचालक तानाजी वाघमोडे, भिमराव फाटे, पं.स. सदस्य सत्यवान देवकुळे, लेबर फेडरेशनचे बाळासाहेब बागल, मा.जिल्हाध्यक्ष तानाजी बापू बागल, समाधान फाटे, मा.सरपंच महादेव बागल, दत्ता हुंडेकरी, चेअरमन पांडुरंग बागल, ग्रा.सदस्य मोहन बागल, महादेव फाटे, बाळासाहेब बागल, संदीप कळसुले,प्रा.आरोग्य केंद्र गादेगावचे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: