डॉ बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेदाला वाहून घेतलेला तपस्वी हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेदाला वाहून घेतलेला तपस्वी हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले With the demise of Dr. Balaji Tambe, ascetic who carried Ayurveda was lost – Union Minister of State Ramdas Athawale

मुंबई – आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेद आणि योगाची सांगड घालुन असाध्य रोगांवर उपचार करणारे आत्मसंतुलन केंद्राचे प्रमुख बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेदाला वाहून घेतलेले तपस्वी व्यक्तिमत्व हरपले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

आयुर्वेद ,आयुर्वेदिक फिजियोथेरपी या विषयांत त्यांनी संशोधन केले आहे.आयुर्वेद आणि योग या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केला असून  आयुर्वेदाबाबत जनजागृती केली आहे.

आयुर्वेदाचार्य दिवंगत बालाजी तांबे यांचे आयुर्वेद क्षेत्रात अभूतपूर्व योगदान असून त्यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: