अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण Prize distribution of state level online oratory competitions on the occasion of Abhijeet Patil’s birthday

पंढरपूर – ऑक्सिजन मॅन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. कोरोनामुळं मागील दोन वर्षांपासून मुलांनाही खुलं व्यासपीठ मिळाले नव्हते. मात्र या वक्तृत्व स्पर्धेत ६० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यातील २२ स्पर्धकांनी यश प्राप्त केले. त्यांचा यथोचित सन्मान धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

अभिजीत पाटील म्हणाले की वाढदिवसाचं फक्त निमित्त असलं तरी आपल्या ग्रामीण भागातील मुला मुलींच्या कलेला वाव मिळावा हि संकल्पना माझ्या सहकाऱ्यांनी राबवली. वक्तृत्व ही सुंदर कला असून ती प्रत्येकांनी आत्मसात करायला हवी. जगातील अनेक क्रांत्या आणि अनेक महान व्यक्तिमत्त्व हे वक्तृत्वामुळेच घडल्या आहेत.माझ्या सहकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं.

    या स्पर्धात बाल गटात प्रथम सत्यम पवार,आहिल्या तळेकर, ऋषिकेश तांदळे, संस्कृती गाजरे, विशालाक्षी कौलवार, तनिष्का सांळुखे

    खुला गटामध्ये सुदर्शन लाटे, प्रफुल्ल माळी,रोहन कवडे,सना मुजावर, ऐश्वर्या नागटिळक, संस्कृती कोरे, भुमी झालटे, प्रिती कारंडे तर मोठय़ा गटामध्ये साक्षी आसबे, शिवध्वज गोडसे, शगुफ्ता इनामदार, रेश्मा पवार, मोनाली पाटील, ऋतुजा जगताप, सार्थक खेडकर, आर्या जगताप आशांना प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक व तृतीय पारितोषिक अशी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी प्रा.तुकाराम मस्के, संतोष कांबळे,प्रा.महादेव तळेकर,समाधान गाजरे, अंकुश गाजरे,अजित लोकरे,नितीन पवार,किरण घोडके, इनामदार सर,आदमिले सर,अवधूत घाटे, समाधान गाजरे,विशाल साळुंखे,संजय गवळी, विराज गायकवाड, शंकर सांळुखे तसेच अभिजीत आबा पाटील फाऊंडेशनच्या सर्व सहक-यांनी परिश्रम घेतल्याबद्दल पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: