अध्यक्ष राज ठाकरे यांचेकडून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांचा सन्मान

अध्यक्ष राज ठाकरे यांचेकडून मनसेचे प्रदेश सरचिटणीस मंत्री दिलीप धोत्रे यांचा सन्मान President Raj Thackeray honors MNS state general secretary Minister Dilip Dhotre

पंढरपूर /प्रतिनिधी :-कोरोनाच्या संकटात हजारो कुटुंबाना मदत केलेले,बचत गटांना व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महिलांना कोरोना काळात सहकार्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे च्या सर्वोच्च नेतेपदी निवड केली असून मुंबई येथील कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे याना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

1992 -93 साली पंढरपूर महाविद्यालयाच्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या शाखा अध्यक्षपदी दिलीप धोत्रे यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळेपासून आजतागायत दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत, त्याचे फळ त्यांना मिळाले.सलग 29 वर्ष धोत्रे हे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, कॉलेज चे शाखा अध्यक्ष ते मनसेचे नेते असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.कॉलेज अध्यक्ष, शहराध्यक्ष, उपतालुक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, प्रदेश सरचिटणीस अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. 

सलग 2 वर्ष झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महाभयंकर अशा पूरपरिस्थितीत तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला होता त्याची दखल घेऊन राज साहेब ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती प्रामाणिक पणे पार पाडेन ,सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे सांगून एकनिष्ठतेचे हे फलीत आहे असे दिलीप धोत्रे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: