पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर व स्व. सुधाकरपंत परिचारक पुण्यतिथी साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व स्व. सुधाकरपंत परिचारक पुण्यतिथी साजरी Punyashlok Ahilya Devi Holkar and late Sudhakarpant Paricharak Punyatithi Sajari
पंढरपूर - पंढरपुरातील येळे वस्तीत राजयोगिनी अहिल्यादेवी होळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व माजी आमदार कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे,रोहन परिचारक,अमरनाथ परदेशी, पत्रकार विक्रमराजे कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन रोहन परिचारक व स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब बडवे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कमलताई तोंडे यांनी केले होते.

पिंपळाचे वृक्ष घेतले दत्तक

यावेळी पिंपळ या वृक्षाचे रोपण पंढरपूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचे पिंपळ वृक्ष पत्रकार शंकर कदम यांना यावेळी ए.पी.आय जगदाळे, चौगुले सर आदिंच्या उपस्थितीत दत्तक देण्यात आले.

बाळासाहेब बडवे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमास भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी, गंगाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई बडवे, माजी नगरसेविका कमलताई तोंडे, फेस काॅम पुणे प्रादेशिक सदस्य आशाताई सलगर, मा. उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक विवेक परदेशी,आदित्य फत्तेपूरकर, नगरसेवक कृष्णा वाघमारे, बंटी वाघ,दिपक येळे,पत्रकार संकेत कुलकर्णी, नवनाथ कांबळे, सुनिल येळे आदि उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकुमार कुलकर्णी सर,युवराज सलगर,शीतल येळे,गणेश देसाई,बंकीमचंद्र येळे,बंडू राजपुत,ओंकार सलगर,रवि येळे,विशाल वाघमोडे ,ऋषीकेश गावडे,चेतन येळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: