प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेस पुन्हा मुदतवाढ

प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेस पुन्हा मुदतवाढ Re-extension of registration process for first year D.Pharmacy admission
दि.२० ऑगस्ट पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

पंढरपूर:- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई / एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी या अभ्यास क्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून शनिवार, दि १० जुलै २०२१ पासून ते सुरवातीला ०२ ऑगस्ट नंतर दि. १० ऑगस्ट २०२१ अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत होते पण या दिलेल्या मुदतीत बऱ्याच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे व संबंधित बाबींची पूर्तता होऊ शकली नाही त्यामुळे आता डी.फार्मसी प्रवेशाच्या रजिस्ट्रेशनची मुदत पुन्हा वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता दि.२० ऑगस्ट २०२१ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी), पंढरपूरचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांनी दिली.

     या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेनंतर गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दि.२४ ते २६ ऑगस्ट या दरम्यान करता येईल. यानंतर दि. २८ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांकडे आपल्या प्रवर्गानुसार योग्य ती  कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 

  संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली या सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे.याचा लाभ बारावी उत्तीर्ण व ज्यांना डी. फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे आणि अगोदर दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केलेले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एन.ए.दांडगे मो.क्र.९३७३०९१०४१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य सतीश मांडवे यांनी केले आहे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: