मंञी विजय वड्डटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनमोर्चा संघर्ष समन्वय समितीतर्फे मेळाव्याचे आयोजन

मंञी विजय वड्डटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनमोर्चा संघर्ष समन्वय समितीतर्फे आयोजन Organized by janmorcha Sangharsh Coordinating Committee under the guidance of Mantri Vijay Vaddatiwar
    पंढरपूर - भटके विमुक्त मुक्ती दिनानिमित्त ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चा संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य व्यापी जनसंपर्काच्या माध्यामातुन सोलापूर येथे 31 ऑगस्ट रोजी मदत व पुनर्वसन मंञी विजय वड्डटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्यासाठी ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाचे युवक प्रदेश व समन्वयक समितीचे अध्यक्ष शरद कोळी यांनी गावोगावी जाऊन या मेळाव्यासंदर्भात जन जागृतीपर भेटीगाठी घेऊन ओबीसी, व्हिजेएनटी, अठरापगड बाराबलुतेदार समाज्यातील समाज बांधवाना संबोधित करण्याचे काम सुरू केले आहे.

  नितीन काळे, राजेंद्र बुध्याळ, किसन पाटील, अशोक कोळी, धनाजी बनसोडे, बिराप्पा मोटे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. ही बैठक नानासाहेब केसकर आणि ओबीसी विभागाच्या वतीने केसकरवाडी येथील अहिल्या चौक तुळजाभवानी मंदिर येथे होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: