नाकावाटे घेण्याच्या आजवरच्या पहिल्या लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मंडळाची मंजुरी

DBT-BIRAC च्या मदतीने भारत बायोटेकने विकसित केलेल्या नाकावाटे घेण्याच्या आजवरच्या पहिल्या लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मंडळाची मंजुरी Board approves second and third phase trials of first vaccine to date, developed by Bharat Biotech with the help of DBT-BIRAC

नवी दिल्ली,13 /08/2021,PIB Mumbai – जैव तंत्रज्ञान विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) महामारीच्या जागतिक संकटाविरुद्ध लढाईत आघाडीवर आहेत. त्यांनी एकत्रितपणे विशेषत: लस विकास, निदान, औषध पुनर्वापर, उपचार आणि चाचणीसाठी संशोधन आणि विकास प्रयत्नांना गती देण्याची रणनीती आखली आहे. लसींच्या विकासाला जैवतंत्रज्ञान विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

आत्मनिर्भर 3.0,या तिसऱ्या प्रोत्साहन पॅकेजचा भाग म्हणून कोविड -19 लस विकासाच्या प्रयत्नांना बळकटी आणि गती देण्यासाठी मिशन कोविड सुरक्षा सुरू करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारतवर भर देऊन नागरिकांना सुरक्षित, प्रभावी, परवडणारी आणि सुगम्य कोविड -19 प्रतिबंधक लस लवकरात लवकर आणण्या साठी उपलब्ध संसाधनांना एकत्रित आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

 भारत बायोटेकची इंट्रानेसल लस ही नाकावाटे घेण्याची पहिली लस आहे जिच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मान्यता मिळाली आहे.भारतात मानवी क्लिनिकल चाचण्यांना सामोरी जाणारी अशा प्रकारची ही पहिलीच कोविड -19 प्रतिबंधक लस आहे. BBV154 ही इंट्रानॅसल रेप्लीकेशन-डेफिसिएंट चिंपांझी एडेनोव्हायरस SARS-CoV-2 लस आहे. BBIL कडे  अमेरिकेतील सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठाचे परवानाधारक तंत्रज्ञान आहे.

पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी 18 ते 60 वर्षे वयोगटातल्या व्यक्तींवर पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना या लसीचा कुठलाही त्रास जाणवला नाही असे कंपनीने म्हटले आहे. कोणतीही गंभीर घटनेची नोंद नाही.पूर्वी पूर्व-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासात ही लस सुरक्षित, रोग प्रतिकारक असल्याचे आढळले. या लसीने प्राण्यांमध्ये केलेल्या अभ्यासात अँटीबॉडीज तयार केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: