थेट प्रक्षेपणासह प्रसारभारती सोबत साजरा होणार 75 वा स्वातंत्र्य
थेट प्रक्षेपणासह प्रसारभारती सोबत साजरा होणार 75 वा स्वातंत्र्य Celebrate 75th Independence Day with Prasar bharati with live broadcast
नवी दिल्ली,महासंवाद,13 AUG 2021- यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत असताना,लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि आकाशवाणीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे.
दूरदर्शन आणि आकाशवाणीवर स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रसारण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती श्री.राम नाथ कोविंद यांच्या राष्ट्राला उद्देशून होणाऱ्या भाषणाने सुरु होईल.
40 कॅमेरांच्या माध्यमातून दूरदर्शनवरूवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या थेट प्रसारणाद्वारे या 15 ऑगस्टला लाल किल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणाचा ऐतिहासिक क्षण अधिक विस्तृतपणे प्रेक्षकांना पाहता येणार आहे .
आकाशवाणीच्या राष्ट्रीय वाहिन्या संपूर्ण सोहळ्याचे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील थेट समालोचन श्रोत्यांपर्यंत पोहोचवतील. आकाशवाणीवर दिवसभर विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रम प्रसारित केले जातील.
दूरदर्शन वाहिन्यांवर,डीडी नॅशनल,यूट्यूब वाहिनी वर मल्टीपल लाइव-स्ट्रीम्सवर हाई-डेफ्निशन व्ह्यू मध्ये या भव्य सोहळ्याच्या प्रसारणाव्यतिरिक्त लाल किल्याच्या तटबंदीच्या 360 अंशातील दृष्यांसह मनोहारी परिदृष्य और दुर्मिळ दृष्यांसह तुमच्या स्मार्टफोनवरही संपूर्ण प्रसारण पोहोचविण्यात येणार आहे .
वर नमूद केलेल्या डीडी नॅशनल यूट्यूब वाहिनी वरील मल्टीपल लाइव-स्ट्रीम्सची प्लेलिस्ट –
https://www.youtube.com/playlist?list=PLUiMfS6qzIMxGJdFoUqwuo7C8UBF6w1F7