पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद Pandharpur City Crime Branch arrests a gang involved in motor cycle theft
 पंढरपूर, 14/08/2021 - पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करून त्यांचेकडून १४,४०,००० / - रुपये किंमतीच्या एकूण २९ मोटारसायकली केल्या जप्त पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं ४८०/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक २३/०७/२०२१ रोजी दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,पंढरपूर विभाग पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रीक दृष्टया तपास करुन अकोले बु ,ता.माढा येथील एका इसमाने सदर गुन्हा केल्याचा संशय आला .सदर इसमावर पाळत ठेवत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम व त्यांचे पथकास बातमी मिळाली की , सदर इसम हा त्याचे साथीदारासह त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल चंद्रभागा एस.टी. स्टॅण्ड परिसरात विक्री करण्यास येणार आहे त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम व त्यांचे पथकाने सापळा रचून दोघांना शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले . 

   त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलींबाबत चौकशी केली असता सदरची मोटार सायकल इंदापूर ,जि.पुणे येथून चोरुन आणल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयाचा तपास केला असता असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली . अकोले बु ,ता.माढा येथील आरोपीने व त्याचा साथीदार हा परिते,ता.माढा येथील असून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता चौकशीअंती सदर दोघांनी मिळून पंढरपूर शहरा तून ,इंदापूर,नातेपुते ,वालचंदनगर,यवत,कोथरुड , कुर्डुवाडी ,माळशिरस,बंडगार्डन,खडक,बारामती , भोसरी,सांगली इत्यादी ठिकाणांहून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितल्याने तपासकामी अटक करुन यातील अकोले बु॥ गावातील आरोपीकडून एकूण ८ मोटारसायकली व परिते येथील आरोपी कडून ११ मोटार सायकली अशा एकूण १९ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . तसेच त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी वरील ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटार सायकलीपैकी काही मोटारसायकली तुंगत, ता.पंढरपूर येथील एका इसमाकडे विक्री करण्यास दिल्या असल्याचे सांगितल्याने लागलीच तुंगत येथील इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता एकूण ०६ मोटारसायकली त्याच्याकडे असल्याचे सांगितल्याने त्याही सदर गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आल्या आहे . 

या गुन्हयातील अकोले बु।। येथील व त्याचा परिते येथील साथीदार यांच्याकडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ४६७/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटार सायकल त्यांनीच चोरी केल्याचे त्यांनी सांगितल्याने त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी मोटार सायकल चोरी करुन कंदर ,ता .करमाळा येथील एका इसमाकडे विक्री करण्यास दिल्या असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं . ४६७/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटारसायकल व इतर २ मोटारसायकली अशा ३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . वरील प्रमाणे गुन्हयात जप्त केलेल्या मोटार सायकली हया पंढरपूर शहरातील व इंदापूर ,नातेपुते,माळशिरस,कुर्डुवाडी , यवत ,कोथरुड ,बंडगार्डन ,खडक ,भोसरी , बारामती, वालचंदनगर,मिरज इत्यादी गावातील आहेत . सदर मोटारसायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी महेश कांतीलाल नवले , वय २१ वर्षे , रा . अकोले बु ,ता .माढा, सिध्दार्थ उर्फ अमर संजय मुसळे ,वय २३ वर्षे ,रा .परिते , ता.माढा, सदाशिव महादेव फडतरे,वय २८ वर्षे ,रा.तुंगत ,ता.पंढरपूर, सोमनाथ उर्फ दादा दिलीप वाघमारे,वय २२ वर्षे , रा.कंदर,ता.करमाळा असे आहेत.

 पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मागील १ वर्षाच्या कालावधीत एकूण १११ मोटार सायकली ३९,००००० /- रुपये अंदाने किंमतीच्या जप्त केल्या आहेत .सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पंढरपूर विभाग ,पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम,पो.हे.कॉ.शरद कदम ,पो.हे.कॉ. बिपीनचंद्र ढेरे,पो.हे.कॉ.सुरज हेंबाडे,पो.हे.कॉ. राजेश गोसावी, पो.हे.कॉ.इरफान मुलाणी,पो.ना.इरफान शेख,पो.ना. शोएब पठाण ,पो.ना.महेश पवार ,पो.कॉ. संजय गुटाळ ,पो.ना.सुनिल बनसोडे ,पो.ना.सुजित जाधव ,पो.कॉ. समाधान माने,पो.कॉ.विनोद पाटील ,पो.कॉ.अर्जून केवळे , पो.कॉ.अन्वर आतार ( सायबर पोलीस ठाणे ) यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस नाईक सुनिल बनसोडे व महेश पवार हे करीत आहेत . 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: