महागाईमुळे टू व्हिलरवर ट्रिपल शीटप्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी Bhartiya Rastrawadi party has demanded permission for triple sheet travel on two-wheelers due to inflation
पुणे /पिंपरी चिंचवड - पेट्रोल महागाईमुळे टू व्हिलरवर ट्रिपल शीट प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी असे निवेदन भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्यावतीने देण्यात आले आहे.
कोरोनासारख्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षांत लॉकडाउनमुळे कामधंदा राहिला नाही बेरोजगारी वाढली. केंद्र सरकारकडून सारखी महागाई वाढत आहे. गॅस ,पेट्रोल ,अन्नधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत त्यामुळे महागाईत रोज वाढ होत चालली आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध कमी करण्यात आल्याने कामे आता कुठे सुरू झाली आहेत.सर्व वर्गाची आर्थिक परिस्थिती सध्या खूप बिकट आहे . आज कालच्या जगात राहायचे असेल तर गाडी हा फास्ट पर्यांय आहे. त्यामुळे काम करण्यासाठी गाडी लागते नाहीतर आम्ही सायकल किंवा पायी काम केले असते यासाठी आपण तुम्ही आमचा विचार करून टू व्हिलर व पिंपरी चिंचवड मधील कामधंदे करण्याना ट्रिपल शीट प्रवास करण्याची मुभा द्यावी असे निवेदन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचेवतीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,गृहमंत्री व वाहतूक विभागाचे आयुक्त यांना दिले आहे ,अशी माहिती भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख अजित संचेती यांनी दिली आहे .