आणि १९४७ चा स्वातंत्र्यलढा आठवला..

आणि १९४७ चा स्वातंत्र्यलढा आठवला.. And remembered the freedom struggle of 1947….

कुर्डुवाडी / राहुल धोका :- भारतात स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात कुर्डुवाडीतील अनेकांना पारतंत्र्याच्या वाचनीय इतिहासाच्या आठवणी ताज्या झाल्या .

 शहरातील नगरपालिका कार्यालय सोडून सर्व शासकीय, अर्धशासकिय,खाजगी,शालेय ध्वजा रोहणाच्या कार्यक्रमांवर कोरोनामुळे बंदी असल्याने या ठिकाणी ध्वजारोहण झाले नाही.

कुर्डुवाडी शहरातील कोरोना रुग्ण संख्या सामान्य आहे .दोन लस घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे परंतु याचे व्यवस्थित आकलन न करता सरसकट संपुर्ण तालुक्यांसाठी एकसारखा आदेश काढला गेला. दोन लस घेतलेल्या व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देणे गरजेचे होते. मात्र या बाबत कोणताच विचार झाला नाही. तालुक्यात अनेक गावात कोरोनाची संख्या शुन्य होती.किमान स्वातंत्र्य दिनी अशा ठिकाणी योग्य नियम पाळून परवानगी देणे गरजेचे नव्हते का असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे .परंतु कोरोनाच्या नावा खाली काढलेले नियम हे इंग्रजी राज्य कसे होते याचीच जाणीव सामन्यात नागरिकांना होत आहे ?

कुर्डुवाडी शहरातील आझाद मैदानात,गांधी चौक, टिळक चौक या प्रसिध्द ठिकाणी ही ध्वजारोहण झाले नाही . गर्दीचे कारण सांगून ध्वजारोहण नाकारले असले तरी शासकीय कार्यालय सोमवार ते शुक्रवार खुली असतात या ठिकाणी अधिकारी कर्मचारी असतातच याच उपस्थित राहणाऱ्या कर्मचार्यांकडून कोरोना नियम पाळून ध्वजारोहण होवु शकले नसते का ? शासकिय कार्यलयात उपस्थिती ५०% असते त्यातीलच काही शासकीय कर्मचारी हे कार्य करु शकले नसते का ? का ध्वजारोहणासाठी वेगळे नियम आवश्यक होते ?
कोरोना हा रोग प्राणघातक आहे, मानवी जीवन समोर ठेवून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मर्यादित केला हे योग्यच आहे.

सार्वजनिक ठिकाणे, शाळा या सोडून कोरोना संख्या ० अथवा नगण्य आहे अशा ठिकाणी , सुट्टी व्यतरिक्त ५० % क्षमतेने चालू असलेली सरकारी कार्यालयासाठी वेगळ्या नियमाची आवश्यकता होती.

 दिलेला आदेश बरोबरच आहे, मानायचे एवढेच आता हातात असल्याने स्वातंत्र पुर्व काळाच्या कथाच जणु डोळ्यासमोर तरळु लागल्या आहेत. स्वातंत्र पूर्वकाळात तिरंग्यासाठी मरण ही पत्करले गेले होते. मृत्युची भय न बाळगता सीमेवर तैनात  जवान यांच्या आठवणी या वर्षी ही या निमित्ताने ताज्या झाल्या .कोरोना काळात अत्यावश्यक सेवा चालु असतात म्हणजे स्वातंत्र्य दिन आवश्यक मध्ये असतो पण प्रशासकिय रविवार सुट्टी चा दिवस हि आवश्यक व प्रिय असतो ? स्वातंत्र्य दिनीच्या निमित्ताने व्यक्त केलेल्या या भावना स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्याची उत्कंठाच आहे भारतीय म्हणून देश प्रेमापोटी व्यक्त होणारा हा राग ही देशप्रेमच आहे एवढेच !!

जय हिंद ! भारत माता कि जय!!

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: