स्वातंत्र्य दिनानिमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाच्या फुलांची आरास

स्वातंत्र्य दिनानिमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाच्या फुलांची आरास Decoration of tricolor flowers at Sri Vitthal Rukmini Temple on the occasion of Independence Day

पंढरपूर, १५/०८/२०२१ – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी तिरंगा रंगाच्या फुलाची आरास करण्यात आली आहे.

आज रविवार दि.१५ /०८/२०२१ रोजी ७५ व्या स्वातंत्रदिनानिमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभार्यास तसेच संपुर्ण मंदिरात विविध रंगांच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे . त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्या सह मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले.७५ व्या स्वातंत्रदिना निमीत्त फुलांची ही आरास श्रीमंत मोरया प्रतिष्ठाण , पुणे यांच्यावतीने करण्यात आली आहे . 

 यासाठी ऑर्केड ,शेवंती ,कामिनी,कारनेशन इ . फुलांच्या प्रकारांची व पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे . साधारणतः ७०० किलो फुले वापरुन आरास करण्यात आली आहे . फुलांची आरास डेकोरेटर शिंदे ब्रदर्स ,साई डेकोरेटर्स हे आहेत अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: