भारतीय संविधानाद्वारे दिलेले अधिकार मिळत नसतील तर रस्त्यावर उतरा – सुनील ओहोळ

भारतीय संविधानाद्वारे दिलेले अधिकार मिळत नसतील तर रस्त्यावर उतरा – सुनील ओहोळ If you don’t get the rights given by the Indian Constitution,take to streets – Sunil Ohol

पंढरपूर /नागेश आदापूरे – सुस्ते तालुका पंढरपूर येथे बहुजन सत्यशोधक महिला संघ शाखा उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी बोलताना सुनील ओहोळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधाना द्वारे महिलांना हक्क अधिकार दिले आहेत ते हक्क व अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नसतील तर आपण रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे, यासाठी संघटित होऊन संघर्ष करा, संघटना तुमच्या पाठीशी राहील.एससी,एसटी वर होणारे अन्याय अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, ओबीसीची जातिनिहाय जनगणना करावी असे ते म्हणाले.

यावेळी बहुजन सत्यशोधक महिला संघ प.महा. उपाध्यक्ष ज्योतीताई भुजंगे, नूतन पंढरपूर तालुका संघटक सोनाताई कांबळे,गायत्रीताई रणदिवे शाखाध्यक्ष,प.महाराष्ट्र सदस्य अनिल सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे,युवक नेते महादेव गाडे,पंढरपूर ता.युवक उपाध्यक्ष आदर्श लोंढे,सुरेश वाघमारे, सतीश वाघमारे,लखन वाघमारे,आप्पासाहेब ओहोळ,सुनील लोंढे, लखन वाघमारे,लक्ष्‍मण वाघमारे,अविंदा रणदिवे ,चंदा रणदिवे,सुषमा पाटोळे, मंगल खवळे, सोनाली कांबळे यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: