शेळवे येथील संगोबा मंदिरात श्रावणी सोमवार असुनही भाविकांची तुरळक गर्दी
शेळवे येथील संगोबा मंदिरात श्रावणी सोमवार असुनही भाविकांची तुरळक गर्दी !
शेळवे / संभाजी वाघुले : शेळवे ता.पंढरपूर येथील संगोबा मंदिर अत्यंत जुने व हेमाडपंथीय आहे.या मंदिरात प्रत्येक वर्षी महाशिवराञी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच संपुर्ण श्रावण महिन्यात व श्रावणी सोमवारी या दिवशी दिवसभर हजारो भाविक दर्शन कोरोनाच्या अगोदर घेत असत.
परंतु मागिल वर्षापासुन शेळवे यैथील संगोबा मंदिरात कोरोना प्रादुर्भावामुळे श्रावणातही भाविक तुरळकच येत आहेत. येणारे सर्व भाविक कोरोनाचे सर्व नियम पाळुनच संगोबाचे दर्शन घेत आहेत. शेळवे परिसरातील शेळवे देवडे खेडभाळवणी पिराचीकुरोली पटवर्धनकुरोली भंडीशेगाव अशा सर्व गावातील भाविक दर्शनाला पहाटेपासुन येत असत परंतु मागील वर्षापासुन भाविक तुरळकच दर्शनासाठी येत आहेत.
शेळवे येथील संगोबा मंदिर हे कासाळ ओढा व भिमा नदीच्या संगमावर असल्यामुळे या मंदिराला संगोबा असे संबोधले जाते.या मंदिरातील पिंड अत्यंत जुनी व मोठी आहे.या पिंडीवरील शालिग्राम हा मोकळा आहे.असा शालिग्राम मोकळा असणारे असे मंदिर आसपास कुठेही पाहायला मिळत नाही.
भिमा नदी पाञ व कासाळ ओढा यांच्या संगमापासुन अवघ्या २०० फुटावर हे संगोबा मंदिर आहे. भिमा नदीला आजपर्यंत आलेल्या पुरात एकदाही या मंदिरात पाणी गेलेले नाही. या मंदिराच्या आसपासची गावे शेळवे ,पिराची कुरोली या गावात पाणी शिरते परंतु संगोबा मंदिराच्या खालील पायरीपर्यंतच पाणी येते. पण मंदिरात आजपर्यंत कधीच पाणी शिरलेले नाही.
या संगोबा मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजुस मोठा दगडी कुंड आहे.तसेच मंदिराच्या बाजुला जुन्या दगडी कोरीव शिळा आहेत.तसेच मंदिराच्या पुढील बाजुसलाही लहान व मोकळा शालिग्राम असणारी पिंड आहे.
भिमा नदी व कासाळ ओढा या संगमावर ही एक मंदिर असल्याच्या खुणाही आहेत. मागील काही वर्षापुर्वी नदीपाञ (चवञा) संपुर्ण कोरडे पडल्यानंतर या ठिकाणी मंदिर असल्याच्या खुणा आढळुन आल्या आहेत.सद्या या संगमावर म्हणजेच चवञ्यावर (संगम) ८ ते १० फुटापेक्षा जास्त पाणी आहे.
संगोबा दर्शनाला येणार्या सर्व भाविकांना आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळुनच दर्शन घेण्याचा सल्ला देत आहोत – मनोज कौलगे,शेळवे