बँक मित्रांचे भविष्य अंधारात

बँक मित्रांचे भविष्य अंधारात..The future of bank friends is in the dark
  खर्डी / अमोल कुलकर्णी:- जनधन योजनेच्या माध्यमातून बँक खातेदाराला विविध योजना देऊन खातेदारांना आधार दिला. अंमलबजावणीसाठी बँकेच्या माध्यमातून बँक मित्राची मानधनावर नियुक्ती केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना जनतेसमोर आणली होती
   ग्रामीण भागातील दोन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात राष्ट्रीयकृत बँकेला शाखा उघडून त्यावर होणारा खर्च परवडत नसल्यामुळे बँकेने त्याच गावातील सुशिक्षित तरुणांना बँक मित्र म्हणून नियुक्त केले होते . सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ठराविक स्वरूपात मानधन होते व केलेल्या आर्थिक उलाढालीवर कमिशन दिल्याने त्याचे कुटुंब बऱ्यापैकी चालत होते. परंतु याची व्याप्ती आणि प्रमाण वाढल्यावर मित्रांच्या सुरक्षिततेबाबत बँकेने विचार न करता निश्चित केलेले मानधन देणे बंद करून टाकले. कमिशन टक्केवारी देखील कमी करून टाकली. बँक मित्राकडून जनधन बॅक खाती,आधार लिंक, मोबाईल क्रमांक, जोडणे,थकीत कर्ज वसुली,ठेवी यासह बँकेची बहुतांश कामे बँक मित्राच्या अंगावर टाकून त्यांच्याकडून करून घेण्याचा सपाटा लावला. पण त्या बदल्यात योग्य मोबदला दिला नाही. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ,अटल पेन्शन योजना या योजनेची ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत अंमलबजावणी करण्याचे उदिष्टपुर्ती बँक मित्रावर सोपवण्यात आली होती.त्यासाठी ठराविक दिवशी अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी आणण्याची सक्ती देखील करण्यात आली  होती. यात काम न करणाऱ्या बँक मित्रांना तंबी देण्यात आली. याशिवाय बँकेने दिलेल्या पण वसुली न होणाऱ्या कर्जाच्या खातेदाराला वारंवार भेट घेऊन वसुलीची तंबी देण्याचे कामही मित्रांना करावे लागत होते. ग्रामीण भागातील अशिक्षित घरापर्यंत बँकिंग सेवा केली.याचे श्रेय,कष्ट घेतलेल्या बँक मित्रांना बँकेने वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,भारतीय स्टेट बँक,कॅनरा बँक अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक,विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बॅक या आणि राष्ट्रीयत्व व प्रादेशिक ग्रामीण बँकानी जिल्ह्यात ही सुविधा बँक मित्रा माध्यमातून त्यांची ही कामे करून घेतली.अलीकडच्या काळात काही बँकांनी कंपनीची नियुक्ती करून त्या माध्यमातून सेवा देऊन बँक मित्रांना आता वाऱ्यावर सोडण्याची तयारी ठेवली आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी बँक मित्राशी केलेल्या कराराचा गाशा गुंडाळण्याच्या तयारीत बँका असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात वसुलीसाठी गेल्यावर कर्जदारा कडून अपशब्द आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यांचाही सामना करावा लागतो.बँक मित्रामुळे बँकीग सेवा घरोघरी गेल्याने बँकेतील गर्दी कमी झाली.या सर्व बाबींचा विचार करून बँक मित्राला बँकिंग कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्याची गरज आहे.

अमोल जाधव , बँक मित्र पळशी,गादेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: