राज्यभर राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

राज्यात रक्ताची कमतरता भासू लागल्याने राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

    पंढरपूर, विजय काळे - राज्यासह देशभरात  कोरोनाच्या साथीमुळे रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे रक्ताची कमतरता भासू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असा आदेश दिल्याने या आदेशा नुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष महिबुबभाई शेख यांचे मार्गदर्शना खाली पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आज पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.या रक्तदान शिबिरात ५५ वेळा रक्तदान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिध्दी प्रमुख विजय काळे यांनी सुरवात करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

यावेळी श्री.विठ्ठल सह.सह.साखर कारखान्याचे चेअरमन व महाविकासआघाडी उमेदवार भगीरथ भारत भालके,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,ए.पी.आय जगदाळे,शहराध्यक्ष सुधीर भोसले,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश राजुबापू पाटील,युवकचे प्रदेश सरचिटणीस अरूण आसबे,शंकर सुरवसे,राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा श्रेया किरण भोसले, ओबिसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधना राऊत,युवकचे शहराध्यक्ष स्वप्निल जगताप ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गिरिष चाकोते, युवराज भोसले,प्रसिध्दी प्रमुख विजय काळे, कृष्णात माळी,अल्पसंख्यांक सेलचे बाळासाहेब शेख,सचिव सचिन आदमिले, सचिन सोळंकी,मनोज आदलिंगे,निलेश कोरके, सागर पडगळ,राकेश साळुंखे,सुरज गंगेकर, विशाल सावंत,सारंग महामुनी यांचेसह संगिता माने,सुनंदा उमाटे, प्राजक्ता परचंडराव,किर्ती मोरे,अमृता शेळके यांचेसह महिला पदाधिकारी, युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन भादुले चौकातील न्यु दोस्ती डिजीटल येथे करण्यात आले होते.

  याप्रसंगी सर्व रक्तदात्यांना झाडांची रोपे तसेच सॕनिटायझर व मास्क भेट देण्यात आले.हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे राबविण्यासाठी डॉ. प्रसाद खाडिलकर आणि पंढरपूर ब्लड बँकेच्या स्टाफने सहकार्य केले.

राज्यभर राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन Organizing blood donation camps by NCP all over the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: