सांगोला तालुक्यात मा.आ.कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पुष्पवृष्टीचा कार्यक्रम

सांगोला तालुक्यात मा.आ.कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पुष्पवृष्टीचा कार्यक्रम

खर्डी /अमोल कुलकर्णी :- सांगोला तालुक्यातील महिम येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथे माजी आमदार कै. सुधाकरपंत परिचारक sudhakar pant Paricharak यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टीचा कार्यक्रम घेण्यात आला. दूध उत्पादन आणि ऊस शेती अशा माध्यमातून माजी आमदार कै. सुधाकरपंत परिचारक यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न हाताळले होते.त्यामुळे जिल्ह्यात त्यांना मानणारे लोक तयार झाले होते. ग्रामस्थ व ऊस उत्पादक सभासद आणि वाहन मालक यांच्या वतीने दि.17 ऑगस्ट रोजी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.पसायदान म्हणून पुष्पवृष्टी करण्यात आली.

 यावेळी ऊस उत्पादक सभासद दिगंबर येडगे, सोमनाथ पाटील,बापूराव कारंडे,सिताराम शिरगिरे,विजय मरगर दिलीप मरगर ,फुलचंद मरगर,वाहन मालक यशवंत कारंडे,दत्तात्रय घोगरे,मोहन रुपनर,सोमनाथ सुरवसे ,विकास बेंदगुडे,सचिन झाडे,तानाजी कोळेकर,कल्याण शेंडगे,नागेश लोखंडे आदी उपस्थित होते.

 या कार्यक्रमास युटोपियन शुगर चे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे ,सांगोला गटाचे ॲग्री ओव्हरसियर संतोष कुलकर्णी व शेती खात्याचे धनंजय राऊत, तानाजी वगरे आणि अनिल धुमाळ उपस्थित होते.या कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.

ग्रामस्थांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडला.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: