नाथचौक तरुण मंडळाच्यावतीने स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचे पूजन

नाथ चौक तरुण मंडळाच्यावतीने स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचे पूजन Worship of image on the occasion of first remembrance of late Sudhakar Pant Paricharak on behalf of Nath Chowk Tarun Mandal
    पंढरपूर, १८/०८/२०२१ - नाथ चौक तरुण मंडळाचे श्रद्धास्थान लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ कार्यकर्ते शमशुद्दीन सत्तारमेकर यांचे हस्ते नगरपालिका पक्षनेते अनिल अभंगराव ,उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, माजी नगराध्यक्ष सतीश मुळे,पांडुरंग घंटी, रा.पा. कटेकर,संजय जवंजाळ,विष्णू मैदर्गीकर,धनंजय मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

यावेळी नगरसेवक अनिल अभंगराव यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या जीवन कार्याचा गौरव करून नाथ चौक तरुण मंडळावर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांना घडविले व सामाजिक कार्याचा वसा दिला असल्याचे सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी राजेंद्र अष्टेकर,विनोद भरते,उद्धव आसबे,श्रीमंत परचंडे,श्रीरंग मेटकरी,ओंकार जोशी, बाळासाहेब कौलवार आदीसह मंडळाचे कार्यकर्ते नामदेव मिसाळ, गणेश जवंजाळ, ओंकार वाळुजकर, हेमंत मैंदर्गीकर, ओंकार मैंदर्गीकर, राजू सत्तारमेकर आणि नाथ चौकातील व्यापारी, नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: