सरसकट सर्व डॉक्टरांची किंवा हाँस्पिटलची बदनामी निश्चितच विचार करायला लावणारी

कुर्डुवाडीतील डाॅक्टरांवरील आरोप, पत्रकार परिषदेत विविध विषयांवर केला खुलासा Allegations against doctors in Kurduwadi, revealed at various press conference
  कुर्डुवाडी / राहुल धोका - कुर्डुवाडी कोविड हॉस्पिटल बीलसंदर्भात रुग्णांमध्ये,नागरिकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे त्याकरिता पत्रकार परिषद घेवून खुलासा करण्यात आला आहे. या वेळी डाॅ.विलास मेहता , डाॅ. संतोष कुलकर्णी, डाॅ. आशिष शहा, डाॅ चंद्रशेखर साखरे, डाॅ.सचिन गोडसे ,डाॅ.रोहित बोबडे, डाॅ संतोष सुर्वे, डाॅ देवकते, डाॅ.लकी दोशी,डाॅ जयंत करंदीकर, डाॅ. माढेकर आदि उपस्थित होते.

      माढा तालुक्यात कोविड साथ सुरू झाल्या पासून सर्वच वैद्यकीय संघटना,सामाजिक संघटना, पत्रकार यांनी पाठपुरावा करूनही कुर्डूवाडीमध्ये किंवा तालुक्यात गरीब,गरजू रुग्णांना मोफत कोविड हॉस्पिटल, डी.सी.एच ज्या ठिकाणी ऑक्सिजन व आय.सी.यु ची सुविधा आहे असे हॉस्पिटल जिल्हा ,स्थानिक प्रशासन , राजकीय पदाधिकारी किंवा समाजसेवी संघटना यांच्या कडून आजतागायत उभारण्यात आलेले नाही ही शोकांतिका आहे . त्यामुळे गरिबांपासून श्रीमंतांना सध्य परिस्थितीत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागतो आहे.दुसऱ्या कोविडच्या लाटेमध्ये ग्रामीण रुग्णालयातील अर्धा भाग कोविड हॉस्पिटल करून किमान ४०० ते ५०० गरजूं रुग्णावर ऑक्सिजन सहित उपचार करण्यात आले परंतु त्याचा कुर्डूवाडी व परिसरातील लोकांना फारसा उपयोग होत नाही.त्यामुळे शासनाने , सामाजिक संघटनांनी मोफत कोविड हॉस्पिटल ऑक्सिजन, आय सी यु सुविधा सहित सुरू केले तर आम्ही सर्व डॉक्टर्स संघटना नक्कीच मदत करु जेणेकरून तातडीची गरज असलेल्या पैशाविना उपचारापासून वंचित राहावे लागणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार होवू शकतील. 

  खाजगी हॉस्पिटलमध्ये कुर्डूवाडी व तालुक्यात जो कोविड रुग्णावर उपचार केला जात आहे तो महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार,आय सी एम आर गाईडलाईन्सनुसार चालू आहे . त्या करिता स्थानिक महसूल व आरोग्य प्रशासना कडून कोविड हॉस्पिटलची तपासणी केली जाते त्यामध्ये कधीही कोणतेही हॉस्पिटल शासनाच्या कोविड उपचार मार्गदर्शक सूचनेचे उल्लंघन करताना दोषी आढळून आले नाही किंवा त्यांच्या विरुद्ध उपजिल्हाधिकारी ,आरोग्य विभागाकडून  आजतागायत नोटीस देवून कारवाई करण्यात आलेली नाही .संपूर्ण कोविड काळात कुर्डूवाडी व माढा तालुक्यात प्रांत अधिकारी ज्योती कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल ,आरोग्य विभाग , खाजगी हॉस्पिटल वेळोवेळी एकमेकांना सहकार्य करून साथीचा मुकाबला करत आहेत तसेच त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही याकरिता जिल्हाधिकार्यांनी वेळोवेळी कौतुक केले आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या बिलाचे लेखापरीक्षण प्रांत ऑफिसने नेमून दिलेले लेखाधिकारी करतात , रूग्ण हॉस्पिटलमधून सोडण्यापूर्वी त्यांना सर्व बील दाखवून ते शासनाच्या दरपत्रकानुसार बील घेतले आहे का याची खातरजमा करून लेखा परिक्षकांनी त्याला हिरवा कंदील दाखवून बील पास केल्यानंतर ते रुग्णांना दिले जाते त्यामुळे यात कोणी शंका घेण्याचे काहीच कारण नाही . कोविड साथ चालू होती त्यावेळेस रुग्णांना बार्शी ,सोलापूरमध्ये सुध्दा आय.सी.यु बेड मिळत नव्हता त्यावेळेस कुर्डूवाडी व माढा तालुक्यातील खाजगी कोविड हॉस्पिटलनी अनेक रुग्णांना तात्काळ उपचार करून स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करता जीवदान दिले . त्यामुळे माढा तालुक्यातील सर्व सिरियस रूग्णांना खाजगी कोविड हॉस्पिटलचां आधार होता हे सत्य नाकारता येत नाही .दुसऱ्या लाटेनंतर कोविड रुग्ण कमी झाली , लॉकडाउनमध्ये शिथिलता आली त्या नंतर हाताच्या बोटावर मोजता येतील अश्या काही रुग्णांनी गेल्या ३ महिन्यात तक्रार लेखापरीक्षण करणाऱ्या विभागाकडे केली त्यानुसार त्यांनी पुन्हा लेखापरीक्षण केले आणि काही रुग्णाच्या बिलात ५०० रुपये ते जास्तीत जास्त २००० रुपये पर्यंतचां परतावा गेल्या ६  महिन्यापासून उपचार घेत असणाऱ्या रुग्णांच्या बिलांत काढून तो खाजगी हॉस्पिटलना अदा करण्यास सांगितलं आहे . वास्तविक पाहता ह्याच शासकीय अधिकारी मंडळींनी पूर्वी लेखापरीक्षण केले असताना आता परतावा देण्यास सांगतात, आम्ही सुध्दा किरकोळ रकमा असल्यामुळे त्यांना सहकार्य केले आहे . जास्तीच्या बिलाचा रुग्ण परतावा करा असे आदेश देत असताना लेखा परीक्षण अधिकारी यांनी जो जास्तीत जास्त परतावा काढला आहे तो रुग्णांना जेवण दिले नाही त्याचे प्रति दिन किमान २०० रुपये तसेच तुम्ही निवासी वैद्यकीय अधिकारी  कन्सल्टिंग फिस किंवा नर्सिंग चार्ज जे सर्वच हॉस्पिटल लावतात ते वेगळे लावू नका ते २०० ते ३०० रुपये प्रति दिन कमी करा असे आदेश दिले त्यामुळे एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरासरी किमान ५०० रुग्ण उपचार घेतले असतील तर कन्सल्टिंग फी आणि जेवण याची परतावा रक्कम प्रती दिन  ५०० प्रमाणे ५००० दिवस दाखल असेल तर ती  , पाच लाख होते तर याला कोविड उपचारतील महा घोटाळा म्हणता येणार का ? शासनाचे २१ मे २०२० च्या अध्यादेशनुसार महाराष्ट्रात सरसकट कोविड हॉस्पिटलचे दर सारखे होते त्यामध्ये कोणत्या गोष्टी बीलामध्ये समाविष्ट करायच्या याची स्पष्टता होती पण गेल्या १ जुन च्या नवीन शासनाच्या दरपत्रक नुसार शासनाने ग्रामीण , शहरी असे दोन भाग करून त्यामध्ये अ, ब, क वर्ग मध्ये गावाचे वर्गीकरण करून पूर्वीच्या दरपत्रक पेक्षा खाजगी हॉस्पिटलच्या बिलात सरसकट किमान ४०% दर कमी केले आहेत त्यात माढा तालुका क वर्गात येतो त्यामुळे आणखीन दर कमी आहेत .यासाठी आम्ही मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री , जिल्हा अधिकारी यांना १० जून ला निवेदन दिले आहे आणि याबाबतीत उच्च न्यायालय मुंबई येथे शासनाच्या सुधारित दरपत्रक विरोधात याचिका दाखल केली आहे तरीसुद्धा आम्ही स्वतःचे नुकसान सोसून प्रशासनाला साथीच्या काळात सहकार्य करत आहोत.एखाद्या कोविड हॉस्पिटलने चुकीचे बील दिले किंवा शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार केले नाहीत तर जिल्हाधिकारी यांना संबंधित हॉस्पिटलना कारणे दाखवा नोटीस देवून हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आहेत त्यामुळे अशी एकही नोटीस माढा तालुक्या तील हॉस्पिटलना देण्यात आली नाही . ही जी बील मध्ये परतावा रक्कम काढली जात आहे ती प्रती रुग्ण किरकोळ रक्कम आहे जी नियमित लेखा परीक्षणचां भाग आहे त्याला आम्ही सहकार्य करतो आणि ही गोष्ट महाराष्ट्रातील सर्वच हॉस्पिटलच्या बाबतीत घडली आहे त्यामुळे ही काही रुग्णांची केलेली लूट ,महाघोटाळा नाही. या नवीन दरपत्रकामध्ये कमी पैशात सर्व गोष्टी ज्या आम्ही पूर्वीच्या दरपत्रकामध्ये बसवत होतो ते करण्यास शासन सांगत असल्यामुळे ह्या परतावा च्या तांत्रिक त्रुटी आहेत . आमचे सुधारित दर कमी आहेत हे खाजगीमध्ये आरोग्यमंत्री,जिल्हाधिकारी ,लेखा परिक्षण अधिकारी सुध्दा मान्य करतात पणं सरकारला सरकार चालवायचे आहे , जनतेला खुश ठेवायचं आहे , त्यांना पणं माहिती आहे की कोविडमध्ये ८० % रुग्ण सेवा खाजगी हॉस्पिटल देतात.जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी शासनाच्या आदेशाला बांधील आहेत परंतु यामध्ये खाजगी हॉस्पिटलची आर्थिक हानी होत आहे आणि सेवा देवून बदनामी होत आहे .रुग्ण, समाज सेवी संघटना ,समाजातील विचारवंत,राजकारणी,  सोशल मिडीया केवळ खाजगी हॉस्पिटलवर तोंडसुख घेत आहेत पण यातून महाराष्ट्रातील सरकारी कोविड यंत्रणा रुग्णांना सेवा देण्यास  कमी पडत आहे हे सत्य लपणार आहे का ? सरकारी हॉस्पिटल ,शासनाचे मोफत कोविड आय सी यु पुरेसे असते तर रुग्णांना खाजगी हॉस्पिटल कडे जाण्याची वेळ आली नसती.खाजगी हॉस्पिटलनी सुध्दा आनंदाने कोविड हॉस्पिटल सुरू केले नाहीत . शासनाच्या विनंती आदेशाला मान देवून सुरु केली आहेत .खाजगी हॉस्पिटल ज्यांना कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही किंवा असे ट्रस्ट हॉस्पिटल ज्याला कोणतीही शासनाची राजीव गांधी योजना,प्रधानमंत्री आरोग्य योजना लागू नाही त्या हॉस्पिटलला माहितीचा अधिकार लागू नाही,कोणतीही संघटना इतर पेशंट च्या बिलासाठी लेखी पत्र देवून मागणी करून माहिती मागवू शकत नाही किंवा ती माहिती देणे कायदेशीर खाजगी हॉस्पिटलवर बंधनकारक नाही परंतु स्वतः रुग्ण त्यांच्या नावाने सहिने पत्र देवून माहिती मागवू शकतो तो त्याला अधिकार आहे . कोविड हॉस्पिटल मध्ये एखादा रुग्ण मृत झाला तर ग्रामीण भागात तो बील ही भरत नाही ,काही  प्रशासकीय ,राजकीय,सामाजिक प्रतिष्ठित मंडळी ची फोन आली  की त्यांना मान देवून किंवा रुग्ण खरचं गरीब असेल तर आम्ही बील कमी करतो . पणं सध्या सरसकट सर्वांची बील भरतानाची मानसिकता नाही. रुग्ण वाचला म्हणून आनंदीत होवून त्याच्या नातेवाईकांने डबल बील दिले आहे असे आम्ही ऐकून नाही पणं मृत झाला की बील भरले जात नाही उलट तक्रार करतात . वैद्यकीय असा व्यवसाय आहे यामध्ये आम्ही सर्वाँना खुश ठेवू शकत नाही आणि आमची अगतिकता आहे की आमचे दवाखाने लोकांच्या आजारपणावर चालतात यात खाजगी डॉक्टर्सचां काय दोष ?  कोविड संचालकांची रुग्ण सेवा देवूनही प्रसार माध्यमातून पूर्ण सत्य जाणून न घेता कोविड  हॉस्पिटल ची बदनामी होत असेल तर मानसिक खच्चीकरण  होवून ,हा त्रास का आणि कोणासाठी सहन करायचा आणि किती दिवस सहन करायचा असे विचार येतात त्यामुळे आम्ही शासनाकडे दरपत्रक असेल , लेखापरीक्षण असेल याबाबतीत काही मागण्या केल्या आहेत . त्या मान्य झाल्या तर ठीक नाहीतर शासनाच्या मार्गदर्शक सूचने नुसार उपचार देवूनही खाजगी कोविड हॉस्पिटल ची कोणीही बदनामी करत असेल तर आम्हाला कोविड कार्यातून कार्यमुक्त करावे असे निवेदन आरोग्य मंत्री,जिल्हाधिकारी ,उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे . कोणत्या सामाजिक संघटनेने मोफत जंबो कोबिड हॉस्पिटल कुर्डूवाडीमध्ये चालू केले तर त्याला संपूर्ण सहकार्य करू ,सेवा देऊ असे सांगितले.

अपवादात्मक ठिकाणी बिलाबाबत तसेच रुग्णांकडे दुर्लक्ष झाले अशा घटना घडली असेल मात्र सरसकट सर्व डॉक्टरांची किंवा हाँस्पिटलची बदनामी निश्चितच विचार करायला लावणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: