महिला विकास बचत भवन सर्वत्र उभारा – सौ.अश्विनी कासार अष्टेकर

जिम,अभ्यासिका, सामाजीक सभागृह,प्रसाधन गृहाचा समावेश असलेले महिला विकास बचत भवन सर्वत्र उभारा – सौ.अश्विनी कासार अष्टेकर यांची मागणी Mahila Vikas Bachat Bhavan erected everywhere – Mrs. Ashwini Kasar Ashtekar

आटपाडी,दि.१८ /प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील मुख्य शहरे, तालुक्यांची मुख्यालये या ठिकाणी युवती,विद्यार्थीनी, महिलां साठी जिम,अभ्यासिका, सामाजीक सभागृह,बरोबरच मोफत, स्वच्छ, सुलभ प्रसाधनगृहाचा समावेश असलेले महिला विकास बचत भवन सर्वत्र उभारून महिलांच्या आरोग्याबरोबर मन, मस्तक, मनगट,मजबूतीसाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी महावीर कासार अष्टेकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना पाठविलेल्या ईमेल मध्ये केली आहे.

 जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या,तासगांव कवठे महांकाळच्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील,राज्याच्या नेत्या सौ.शैलजाताई जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेस च्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ. छायाताई पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षा सौ.सुश्मिताताई जाधव आदींना हा ईमेल पाठविला आहे .

देशातल्या प्रत्येक गाव खेडे शहरात महिला शक्ती पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे निम्म्याने आहे .तथापि बरोबरीच्या विकासाच्यादृष्टीने महिलांच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच आली आहे .देशातल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री शक्ती ५० टवकेने दिसायला हवी, परंतू अद्याप संसद ,विधी मंडळातच महिलाच्या ५० टक्के आरक्षणाचा प्रश्न रखडत पडला आहे . राज्यात आणि देशात महिलांच्याबाबतीत जी काही सकारात्मक पाऊले उचलली गेली ती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचं पवार यांच्या दुरदृष्टीतूनच . पवार साहेबांमुळेच लाखो भगिनींना ग्रामपंचायती,पंचायत समित्या जिल्हा परिषदा, नगर पंचायतीपासून महानगर पालिकेपर्यत प्रतिनिधीत्व करता आले.अन्य क्षेत्रातही त्या केवळ न केवळ पवार साहेबांच्या दुरदुष्टीच्या निर्णयाने सन्मानाने वावरत आहेत . याचा मला राष्ट्रवादीची कार्यकर्ता या नात्याने अभिमान आहे.

  तालुका स्तरावर अथवा अनेक शहरांमध्ये महिलांच्या व्यायाम, आरोग्य याबाबतची गैरसोय, अर्ध्यातच सुटलेले शिक्षण,दोन चार कि मी परिसरात महिलांसाठी प्रसाधन गृह नसणे ही शोकांतिका बनली आहे.एखादा शे पाचशे महिलांचा कार्यक्रम घ्यायचा तर माफक दरात उपलब्ध होणारी सामाजीक सभागृहांची सर्वच ठिकाणची वानवा हे चित्र बदलणे गरजेचे आहे . प्रत्येक तालुका स्तरावर हजार - दोन हजार बचत गटांच्या माध्यमातून १० ते २० हजार महिला या बचत गटात काम करतात . परंतू अशा बचत गटांच्या उत्पादीत मालाला प्रशस्त , सर्वांनाच सोयीचे ठरेल अशा मध्यवर्ती ठिकाणी हे महिलां साठीचे महिला विकास बचत भवन प्रत्येक शहरे आणि तालुका ठिकाणांची विशेष ओळख बनावी यासाठी प्रथमतः सांगली जिल्ह्यात प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका ठिकाणी अशी महिला विकास बचत भवन साकारावीत आणि टप्प्या टप्प्याने राज्यातही हा महिलांच्या विकासाचा  संवर्धनाचा निर्णय राबवावा अशी मागणीही सौ.अश्विनी कासार अष्टेकर यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: