म्हणून डॉ आशिष कुमार सुना यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार
डॉ आशिषकुमार सुना यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार Dr.Ashish Kumar Suna’s complaint to Superintendent of Police

सोलापूर ,१९/०८/२०२१ – पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना हे गेली पंधरा वर्षापासून मरवडे ता मंगळवेढा या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करत असून मरवडे येथे सर्वसामान्य माणसाला व गोरगरिबांना अल्प दरात औषध उपचार करत असून सन 2017/18 च्या दरम्यान तळसंगी ता मंगळवेढा येथील बबन मागडे ही व्यक्ती आजारी असल्याचे सांगून उपचारासाठी डॉ आशिषकुमार सुना यांच्या मरवडे येथे दवाखान्यात आली होती. त्यांच्यावर डॉ आशिष कुमार सुना यांनी वेळेत योग्य तो उपचार केला होता. त्यानंतर तीन वर्षांनी बबन मागाडे यांनी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार केल्याचे डॉ सुना यांना सांगून चार लाख रुपये द्या अन्यथा तुमची बदनामी करतो ,तुमच्या विरुद्ध पोलीसात तक्रारी करतो, तुमचा दवाखाना कायम बंद करतो असं म्हणून चार लाख रुपये खंडणी मागितली होती. याबाबत डॉ आशिषकुमार सुना यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने डॉ आशिषकुमार सुना यांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात 2020 साली तक्रार देण्यात आली होती.
याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी यांनी या तक्रारी बाबत सखोल चौकशी करून डॉ आशिषकुमार सुना यांचा जबाब नोंदवून घेतला होता परंतु बबन मागाडे यांनी डॉ आशिषकुमार सुना यांच्या विरोधात पुन्हा 17/8/2021 रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने चौकशी करण्या साठी पोलीस पाटील, मरवडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात बोलावल्याचे सांगितले असून बबन मागाडे यांच्या वारंवार चार लाख रुपये खंडणी मागत असल्याने अखेर डॉ आशिषकुमार सुना यांनी बबन मागाडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणे बाबत पोलीस अधीक्षक सोलापूर यांना निवेदन सादर केले आहे.
डॉ सुना यांना खंडणी मागणाऱ्या बबन मागाडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल न केल्यास मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे,सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार ,संघटक धर्मण्णा गोरे, कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी,उपाध्यक्ष बिपीन दिड्डी, प्रसिद्धी प्रमुख भास्कर वोधूल, बाबा काशीद, अण्णा धोत्रे, संतोष खलाटे,अक्षय बबलाद , इम्तियाज अक्कलकोटकर, युनूस अत्तार, शब्बीर शेख ,नागनाथ गणपा, प्रसाद ठक्का, राम हुंडारे, सतीश गडकरी, बाबा कांबळे ,डी डी पांढरे आदी पत्रकार उपस्थित होते.