कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्त वह्या वाटप कार्यक्रम

कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणा निमित्त वह्या वाटप कार्यक्रम Book distribution program on occasion of commemoration of Karmayogi late SudhakarPant Paricharak
    पंढरपूर - लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्यावतीने नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते रोहन परिचारक यांच्या हस्ते गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. साई जिम ,परदेशी नगर येथे सदर उपक्रम पार पडला.माजी आमदार स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ भोसले यांच्या हस्ते झाले आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

   गरजु विद्यार्थ्यांना आवाहन करुन नावनोंदणी करुन सदर उपक्रम नियोजनबध्द राबविण्यात आला असल्याचे लायन्स क्लबचे अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले आणि यापुढेही आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, स्पर्धा , व्यक्तीमत्व विकास शिबीर असे कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले. सदर वह्या लायन्स अध्यक्ष नगरसेवक विवेक परदेशी यांनी स्पॉन्सर केल्या होत्या . 

    या कार्यक्रमात स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भागवताचार्य स्व.वा.ना.उत्पात यांनी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्यावर लिहलेला सा.पंढरी प्रहार मधील लेख पुर्नप्रकाशीत करण्यात आला.

    माजी नगरसेवक अमरनाथ परदेशी यांनी हा विषेश उपक्रम राबवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ललीता कोळवले यांनी केले .आभार रा.पा.कटेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नगरपरिषद  गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, धर्मराज घोडके, नगरसेवक विजय वरपे ,वाडेकर सर, माजी नगरसेविका कमलताई तोंडे, अदित्य जोशी, डि.व्ही.कुलकर्णी, दिपक येळे, मिलींद येळे, विजय खंडेलवाल, रोहन देशपांडे, गणेश देसाई, दिपक थिटे,कैलास करंडे,राजेंद्र गुप्ता, ईम्रान मुल्ला, अमित गडम,सुरेखाताई कुलकर्णी, सिमा गुप्ता, शोभा गुप्ता आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: