संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची कामे मार्गी


महसूल दिनानिमित्त विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट कार्यक्रम

पंढरपूर,दि.05/08/2025:- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 70 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.संबंधित लाभार्थी यांना मंजूरी आदेश देण्यात आले आहेत.तसेच 55 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे.ग्राम महसूल अधिकारी यांनी गावनिहाय गृहभेटी देवून 475 लाभार्थ्यांना प्रलंबित डिबीटी चे कामकाज पूर्ण करुन घेण्याबाबत सांगण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे.


महसूल विभागामार्फत राज्यात दि.1 ऑगस्ट रोजी महसूल दिन व दि.1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्यानुसार मंगळवार दि.5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेटी देऊन डीबीटी करुन घेणे बाबत सूचित करण्यात आले आहे.त्याअनुषंगाने तहसिल कार्यालय पंढरपूर अंतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे डिबीटीव्दारे अनुदान वितरीत न झालेले व आधार प्रमाणित न झालेल्या लाभार्थ्यांची गावनिहाय यादी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी यांना देण्यात आली आहे.
संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक यांनी सदरची यादी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालये व महत्वाच्या ठिकाणी प्रसिध्द करून संबंधित लाभार्थ्यांची घरभेटी करून संबंधित लाभार्थी यांचे आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स,रेशनकार्ड झेरॉक्स, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, दिव्यांग असलेस दिव्यांग प्रमाणपत्र, विधवा असलेस पतीचे मयत प्रमाणपत्र तसेच इनअॅक्टीव्ह आधारकार्ड पुनर्जीवित करण्याबाबत सुचना संबंधति लाभार्थ्यांना दिल्या आहेत.


