अतिरेकी तालिबान संघटनेच्या विरोधात आवाज लागला वाढू

अतिरेकी तालिबान संघटनेच्या विरोधात आवाज वाढू लागला Voices began to rise against the militant Taliban organization

नवी दिल्ली ,१९/०८/२०२१ – अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला असला तरी, देशामध्ये अतिरेकी तालिबान संघटनेच्या विरोधात आवाज वाढू लागला आहेत. आतापर्यंत तालिबानच्या नियंत्रणाबाहेर राहिलेल्या पंजशीर प्रांतात या आंदोलनाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अफगाणिस्तानातील ताजिक वंशाच्या लोकांमधील हिरो म्हणून ओळखले जाणारे अहमद शाह मसूद यांचे पुत्र हे या बंडाचे नेते आहेत. मसूद सोबत अमरुल्ला सालेह ज्यांनी स्वतःला अफगाणिस्तानचा काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले तेही सोबत आहेत. आता या दोघांबरोबर तालिबानच्या विरोधात दणका देण्यासाठी ओळखले जाणारे अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती आणि देशातील शक्तिशाली सरदार अब्दुल रशीद दोस्तम विरोधी गटात सामील झाल्याची माहिती आहे.

      तालिबान जगासमोर सॉफ्ट इमेज सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु अशा घटना देशात सातत्याने घडत आहेत ज्यामुळे असे सिद्ध होत आहे की सॉफ्ट इमेज हा फक्त एक मुखवटा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की तालिबान हे केवळ जगातील देशांकडून मान्यता मिळवण्यासाठी हे करत आहे.सत्य हे आहे की ते त्यांच्या मूलतत्त्ववादाला चिटकून आहेत. 

  द ट्रिब्यूनवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, विरोधी गटातील नेत्यांनी दावा केला आहे की, त्यांना अब्दुल रशीद दोस्तम यांचे समर्थन मिळाले असून दोस्तमची उझ्बेक सेनाही त्यांच्या बाजूने लढेल. असे म्हटले जात आहे की लवकरच विरोधी गटाच्या नेत्यांची बैठक होईल आणि नंतर पुढील लढाई एकत्र लढली जाईल.विरोधी गटाने असा दावा केला आहे की त्यांनी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या चारीकर क्षेत्रावर कब्जा केला आहे.

      विरोधी गटाला मिळणार बळ

   मूळचा उझ्बेकचा दोस्मत सोबत आला तर विरोधी गट अधिक मजबूत होईल. 2001 मध्ये, जेव्हा अमेरिकन सैन्याने तालिबानवर हल्ला केला, तेव्हा दोस्तमनी उत्तर आघाडीचा भाग म्हणून लढा दिला. दोस्तमवर तालिबानींच्या क्रूर हत्येचा आरोप होता मात्र, दोस्तम यांनी सातत्याने हे नाकारले आहे. नंतर ते देशाचे उपराष्ट्रपतीही झाले .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: