हिंगणघाट पोलीसांच्या सतर्कतेमुळे सुपारी घेवून खून करण्याचा प्रयत्न फसला

हिंगणघाट पोलीसांच्या सतर्कतेमुळे सुपारी घेवून खून करण्याचा प्रयत्न फसला Due to the vigilance of Hinganghat police, the assassination attempt was foiled

हिंगणघाट – पोलीस अंमलदार कमलाकर धोटे हे दिनांक ११-०८-२०२१ रोजी कर्तव्य संपल्यावर त्यांचे घरी जेवण करून फिरण्याकरीता नांदोरी चौकात येवून त्यांचे मित्रासोबत बोलत होते तेव्हा दोन इसम तेथे आले व त्यांनी वरोरा जाणे का रास्ता किधर है असे विचारले . पोलीस अंमलदार कमलाकर धोटे यांनी त्यांना वरोरा जाणारा रस्ता दाखविला परंतु सदर पोलीस अंमलदार यांना त्या इसमांवर संशय आल्याने त्यांनी अधिक विचारपूस केली असता त्यापैकी एकाने त्याचे कमरेतील देशी कट्टा काढला आणि आकाशाचे दिशेने फायर केले परंतु फायर झाले नाही व देशी कट्ट्यातील बुलेट खाली पडली. आरोपी हे वरोऱ्याचे दिशेने पळून गेले .दिनांक ११-०८-२०२१ रोजी फिर्यादी पोलीस अंमलदार कमलाकर धोटे यांचे लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड हे करीत होते .

तपास सुरु असतांना गोपनिय माहितीचे आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयीत दोन आरोपीतांचा शोध दिनांक १२-०८-२०२१ रोजी यातील आरोपी मिळून आले व त्यांना पोलीसांनी त्यांची ओळख देवुन देखील आरोपीने तेथून पळ काढला पोलीस पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड व त्यांचे सोबत असलेले पोलीस अंमलदार शेखर डोंगरे व त्यांचे पथकाने जिवाची पर्वा न करता येणोरा ते हिंगणघाट या रोडवर आरोपींचा पाठलाग केला असता आरोपीने त्यांचेकडे असलेल्या देशी कट्याने पोलीसांवर दोन काडतुस फायर केले . त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणार्थ आरोपीस पळुन जाण्यापासुन अटकाव करण्या साठी गोळीबार केला . परंतू आरोपी पसार झाले . त्याच रात्री सदर आरोपींचा त्याच परीसरात शोध घेवून आरोपी जिशान उर्फ जितेंद्र महेश गुप्ता व एक विधी संघर्षित बालक यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले . दोघेही आरोपी मुळचे बिहार राज्यातील राहणारे आहेत . 
हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणाला वळण आरोपी हिंगणघाट पोलीसांच्या जाळ्यात
    आरोपी जिशान उर्फ जितेंद्र महेश गुप्ता यास नमुद गुन्हयाचे अनुषंगाने कसुन चौकशी करण्यात आली असता त्याने सांगितले की ,येणोरा गावा तील राजपाल शंकर फुलझेले यांची पत्नी व आशिष भोलानाथ राउत याचे अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरून राजपाल फुलझेले हा जानेवारी महिन्यात आशिष राउत याचे मागे कुर्‍हाड घेवून धावला होता व आशिष राउत यास तू परत गावात दिसल्यास जिवाने ठार मारण्याची धमकी दिलेली होती . त्यामुळे आशिष राउत हा राजपाल फुलझेले याचे भितीने गाव सोडून चंद्रपुर भद्रावती - वरोरा येथे राहत होता . त्या दरम्यान आशिष राउत याने राजपाल फुलझेले याचा काटा काढण्याचे उद्देशाने जिशान उर्फ जितेंद्र गुप्ता व विधी संघर्षित बालक (बिहार) यांचे सोबत संधान साधून राजपाल शंकर फुलझेले यास जिवानीशी ठार मारण्यासाठी २,००,०००/- रु.(दोन लाख रूपये) ची सुपारी देवुन पुर्वतयारी करिता ६० ते ७० हजार रूपये खर्च करून गुन्हेगारी कट रचल्याचे व त्यानुसार दिनांक ११/०८/२०२१ रोजी राजपाल फुलझेले याचे घराजवळ रेकी (पाहणी) केल्याचे व दिनांक १२/०८/२०२१ रोजी कटा प्रमाणे काम पुर्ण करण्याचे व राजपाल शंकर फुलझेले यास जिवाने ठार मारण्याचे ठरले होते असे सांगितले . परंतु त्याच दिवशी आरोपींचा सतत मागोवा घेवून त्यांच्या शोधावर असलेले पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड तसेच पोलीस अंमलदार शेखर डोंगरे व त्यांचे पथकाचे सतर्कते मुळे आरोपींचा डाव उधळला गेला. या प्रकरणाचा मास्टर माईंड आरोपी आशिष भोलानाथ राउत , वय २९ वर्ष ,रा.येणोरा ,ता.हिंगणघाट जि.वर्धा याचा वरोरा येथे शोध घेवुन त्यास सखोल चौकशी  केली असता त्याने गुन्हा कबुल केल्याने त्यास गुन्हयात रितसर अटक करण्यात करून गुन्हयात एक पल्सर १५० मो.सा. क्र.एमएच ३४/ एजी ६३५२ किंमत ५०,०००/ - रू. , चार मोबाईल संच, दोन सिमकार्ड , एक पल्सर १२५ मोटर सायकल क्र.एमएच -३२ एए -०८२२ किंमत ५०,०००/ - रु., एक लोखंडी देशी कट्टा किंमत ८०००/ - रु . तिन जिवंत काडतुस किंमत ९००/ - रु., दोन खाली केस काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सदर अधिकारी व कर्मचारी यांचे सतर्कते मुळे एका व्यक्तीचा जिव वाचवलेला आहे . 

  ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम ,उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा पियुष जगताप ,निलेश ब्राम्हणे पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, संपत चव्हाण पोलीस निरिक्षक , पो .स्टे .हिंगणघाट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गो.लगड , पोलीस अंमलदार सादिक शेख ,शेखर डोंगरे,निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे ,विशाल बंगाले ,सचिन भालशंकर ,उमाकांत लडके ,मनोज लोहकरे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन हिंगणघाट तसेच महेंद्र इंगळे सहायक पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ,पोलीस अंमलदार दिनेश बोथकर ,निलेश कट्टोजवार , अनुप कावळे सायबर शाखा वर्धा यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: