सुळेवाडी घाटातील मोटारसायकल स्वारास अडवुन लुटणारे आरोपी ७२ तासांत जेरबंद

सुळेवाडी घाटातील मोटारसायकल स्वारास अडवुन लुटणारे आरोपी ७२ तासांत जेरबंद Accused of robbing a motorcycle in Sulewadi Ghat arrested in 72 hours

माळशिरस – माळशिरस पोलिसांनी दमदार कामगिरी केली यात फिर्यादी विशाल बाळासाहेब फाळके वय २३ वर्षे रा.मळोली ता.माळशिरस जि.सोलापुर हे दिनांक १३/०८/२०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजणेचे सुमारास कंपनीतील कामाची सुटटी झालेनंतर साप्ताहीक सुटटीसाठी गावी मोटारसायकल वरुन कोरेगाव – म्हसवड मार्गे मळोली येथे जाण्यासाठी निघाले असता रात्री ०८/२० वा.चे सुमारास फिर्यादी हे सुळेवाडी घाटामध्ये आले असता त्यांचे मोटारसायकलीस पाठीमागुन एक बिगर नंबरची डबलशीट शाईन मोटार सायकलने आडवी गाडी मारून थांबवुन लोखंडी गजाने मारून जखमी करून ५०० रुपये रोख रक्कम , एक कापडी सॅक , फास्ट्रॅक कंपनीचे मनगटी घडयाळ , बोट कंपनीचा हेडफोन व कागदपत्रे जबरदस्तीने चोरून नेली आहेत वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने माळशिरस पोलीस ठाणेस गुर नं ४२७/२०२१ भा.द.वि. कलम .३ ९ ४,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि शशिकांत शेळके हे करीत आहेत . सदरचा गुन्हा घडलेपासुन यातील आरोपी हे पोलीसांना चकवा देत होते . सदर गुन्हयाचा तपास करणेसाठी माळशिरस , म्हसवड , वेळापुर या सर्व पोलीस ठाणेचे हददीतील अनेक गावांमध्ये गोपनीय माहीती संकलीत केल्यानंतर गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा शेरी नं २ वेळापुर ता.माळशिरस येथील दोन आरोपींनी केला आहे, अशी माहिती मिळालेने लागलीच तपासाची गती वाढवुन यातील आरोपींचा शोध घेणेसाठी सपोनि शेळके यांचे तपास पथकाने वेळापुर परिसरात वेषांतर करुन गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय माहिती घेतली . त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपी हा गोवा येथे फिरण्यासाठी गेला आहे अशी माहिती मिळालेनंतर लागलीच तपास पथक वरीष्टांचे आदेशाने गोवा येथे जाण्याकरीता निघाले . सदर आरोपी हे गोव्याहुन परत निघालेची माहिती मिळालेनंतर कोल्हापुर जिल्हयातील आजरा पोलीस ठाणेकडील पोलीसांचे मदतीने सापळा लावुन त्यास आजरा येथे शिताफीने पकडले व त्यानंतर यातील दुसर्‍या आरोपीस सापळा लावुन वेळापुर येथुन ताब्यात घेण्यात आले .

सदर आरोपींकडे तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे कबुल करुन गुन्ह्यातील गेला माल एक कापडी सॅक , फास्ट्रॅक कंपनीचे मनगटी घडयाळ , बोट कंपनीचा हेडफोन असा व गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटारसायकल , गुन्ह्यातील हत्यार, लोखंडी पाईप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . 

 सदर गुन्हयाचा तपास करीत असताना यातील आरोपींकडे चोरीच्या दोन मोटारसायकली मिळुन आल्या आहेत . या मोटारसायकलींबाबत चौकशी केली असता यातील एक मोटारसायकल ही फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापुर गुरनं १९८ / २०२१ भादविक ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील गेला माल असल्याची माहीती मिळाली असुन तो उघडकीस आणला आहे . तसेच दुसरी मोटार सायकल ही वाठार येथुन २ वर्षापुर्वी चोरीस गेली असल्याची माहीती मिळाली आहे . याअगोदर ही सुळेवाडी घाटामध्ये एस.टी महामंडळाची बस लुटणारी टोळी माळशिरस पोलीसांनी अटक केली होती . 

सदरची कामगिरी सोलापुर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते ,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू अकलुज विभाग , दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके ,पोना राहुल वाघ , पोना मारोती शिंदे ,पोकॉ दत्ता खरात ,पोकॉ सोमनाथ माने ,पोकॉ अन्वर आतार (सायबर शाखा) यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: