पंढरपूर नगरपरिषदेत माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन

पंढरपूर नगरपरिषदेत माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन Worship of image on the occasion of former Prime Minister Rajiv Gandhi Jayanti at Pandharpur Municipal Council

पंढरपूर, २०/०८/२०२१ – पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व सदभावना दिन साजरा करण्यात आला.

 यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ साधनाताई  नागेश भोसले यांचे हस्ते उपनगराध्यक्षा श्वेताताई निलराज डोंबे ,पक्ष नेते अनिल अभंगराव,गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

तसेच सदभावना दिनानिमित्ताने प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमास नगरसेविका सुप्रिया डांगे, नगरसेवक राजू सर्वगोड,विजय वरपे व सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, धर्मराज घोडके आदि उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: