पंढरपूर तालुक्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा – अभिजीत पाटील यांच्या मागणीला यश

पंढरपूर तालुक्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा – अभिजीत पाटील यांच्या मागणीला यश Consolation to the farmers of agricultural pump holders in Pandharpur taluka – Success to the demand of Abhijeet Patil
        पंढरपूर / नागेश आदापुरे - पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा महावितरणने पूर्णपणे बंद केला होता त्यासाठी आज युवा नेतृत्व अभिजीत पाटील यांनी पंढरपूर येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता हेमंत कासार यांना निवेदन देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली होती. 

 या चर्चेदरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांसाठी दोन तास विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती केली होती या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हेमंत कासार यांनी  पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन तास विद्युत  पुरवठा सुरू करणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना वीज बील भरण्या साठी महावितरणच्या योजनेचा लाभ घेण्याची विनंती शेतकऱ्यांना अभिजीत पाटील यांनी केली. 

 गेल्या चार-पाच दिवसांपासून कुठलीही नोटीस किंवा पूर्व सुचना न करता महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला होता.एका बाजूला कोरोना महामारीमुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या हंगामातील गाळपास गेलेल्या ऊसाचे बिल कारखान्यांनी अद्याप दिलेले नाही. कोरोनामुळे शेतीमालाला भाव नाही ,दुधाला दर नाही अशा परिस्थीतीत शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज म्हणून अभिजीत पाटील समोर आले असून त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. 

   यावेळी पोहोरगावचे मा.सरपंच सिद्धनाथ गायकवाड,धनंजय बागल,सर्जेराव घाडगे, ज्ञानेश्वर महाराज,समाधान जावळे,नितीन पवार ,गणेश ननवरे, किरणराज घोडके, आण्णासो डुबल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: