काहीजण महिला अधिकाऱ्यांवर कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करतात – ना.डॉ.नीलम गोऱ्हे

श्रीमती ज्योती देवरे तहसीलदार पारनेर यांना होत असलेल्या त्रासाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांच्या माध्यमातून करावी…- ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती Mrs. Jyoti Deore Tehsildar Parner should be investigated through senior women secretaries – Dr.Neelam Gorhe’s request to Chief Minister Uddhav Thackeray through a statement
 मुंबई /पुणे,दि.२१/०८/२०२१ : पारनेर,जि.नगर येथील तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी त्यांना होत असलेल्या त्रासातून आत्महत्येबाबतचे विचार मनात येत असल्याचे एक क्लिपमधून पुढे आले होते. यासंदर्भात श्रीमती देवरे यांच्याशी काल दि.२० ऑगस्ट,२०२१ रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्वतः संपर्क केला. त्यानंतर श्रीमती देवरे यांच्या प्रश्नाबद्दल व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांना निवेदन प्राप्त झाले. या निवेदनाच्या आधाराने ना.डॉ.गोऱ्हे यांनी आज दि.२१ ऑगस्ट, २०२१ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ महिला सचिवांतर्फे या घटनेची चौकशी करावी अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे.

  मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी श्रीमती देवरे संदर्भात विभागीय आयुक्त स्तरावरती चौकशी चालू असून महसूल विभागाच्या मार्फत देखील या घटनेबद्दल लक्ष घालण्यात आलेले आहे असे सांगितले आहे. याखेरीज जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याशी डॉ.गोऱ्हे यांनी संपर्क करून त्यांच्याशी बोलल्या आहेत. यासंदर्भात महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू असून सात दिवसात अहवाल सादर करणार असल्याचे श्री भोसले यांनी सांगितले तसेच या विषयांमध्ये योग्य तो मार्ग काढण्याच्या दृष्टीने डॉ.गोऱ्हे प्रयत्न करणार आहेत.

काहीजण महिला अधिकाऱ्यांवर कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करतात - ना.डॉ.नीलम गोऱ्हे

   लोकप्रतिनिधींची कामे होत असताना काही वेळा मतभेद होतात आणि काही वेळेला विशेष हक्कांचा प्रश्न देखील तयार होतो. दुसऱ्या बाजूला प्रशासनातील काही लोक महिला अधिकाऱ्यांवर किंवा इतरांवर सुद्धा कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करताना दिसतात. या सगळ्याबद्दलची चौकशी झाल्यावर त्यामध्ये वस्तुस्थिती जी आहे ती समोर येईल. या दृष्टीकोना तून या चौकशीमधील तपशिलाची अपेक्षा असेल असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: