कुणाला पुढारी करायचे आणि कुणाला नाही हे वृत्तपत्रांच्या हाती -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

कुणाला पुढारी करायचे आणि कुणाला नाही हे वृत्तपत्रांच्या हाती -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले In the hands of newspapers, who should be the leader and who should not be – Union Minister of State Ramdas Athawale
 मुंबई  - दलित पँथरच्या काळापासून संपादक पत्रकारांनी आम्हाला पाठिंबा दिला.त्या काळात मी लिहिलेल्या हस्तलिखित बातम्या अनेक वृत्तपत्रांत प्रकाशित होत असत. माझ्या आंदोलनाच्या, कार्यक्रमाच्या बातम्या नेहमी वृत्तपत्रात प्रकाशित होत राहिल्या. त्यामुळे मला ओळख मिळाली. कुणाला पुढारी करायचे आणि कुणाला नाही हे वृत्तपत्रांच्या हाती आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मुलुंड मधील आंबेडकरी चळवळीच्या एका दैनिकाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी संपादक बबन कांबळे,रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ,योगेश शिलवंत,दादू झेंडे, अजित रणदिवे, रिबविपरिषद चे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.

     माझ्या पाठीशी आपण सर्वजण आहात. आंबेडकरी जनता माझ्या सोबत आहे त्यामुळे माझे नेतृत्व वाढत गेले. आजच्या इलेक्ट्रॉनिक मिडियामुळे माझी संसदेतील भाषणे जगभर पहिली जातात. आपणही आपल्या कामातून आपल्या भागात ओळख निर्माण करा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. 

रिपब्लिकन पक्षाचे काम सामाजिकदृष्ट्या मोठे आहे.मात्र रिपब्लिकन पक्षाची राजकीय बांधणी करणे महत्वाचे आहे. राज्यात रिपब्लिकन पक्षाचे किमान 10 आमदार निवडुन आणले पाहिजेत. येत्या मुंबई मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आणून मुंबईचा उपमहापौर रिपाइंचा झाला पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांचे राजकीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले पाहिजे. पत्रकारांचे मार्गदर्शन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात आयोजित करू असे ना.रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: