पंढरपूर व सोलापूर जिल्हा सराफ असोसिएशनच्यावतीने बंदला पाठिंबा जाहिर

पंढरपूर व सोलापूर जिल्हा सराफ असोसिएशन च्यावतीने बंदला पाठिंबा जाहिर Pandharpur and Solapur District Saraf Association announces bandh support
पंढरपूर /नागेश आदापुरे - केंद्र शासनाने हॉल मार्किंग कायद्यामधील HUID अनुच्छेद संबंधी जी जाचक नियमावली केली आहे,त्यासाठी सराफ व्यावसायिकांचे  वरिष्ठ मार्गदर्शक श्री रांका आणि त्यांचे सहकार्यांनी यांनी अनेक दिवसांपासून केंद्र शासनाचा पाठपुरावा केल्यानंतरही त्यांचेकडून  योग्य पद्धतीने प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी एक दिवासाचा लाक्षणिक संप येत्या 23/08/21 तारखेला पुकारण्याचे त्यांनी ठरविले आहे.

पंढरपूर सराफ असोसिएशन ,सोलापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशनचा आणि महाराष्ट्र सराफ असोसिएशनचाच एक पोटभाग असल्याने त्यांच्या निर्णयाचे समर्थनासाठी तालुका व शहरातील सर्व सराफ व्यावसायिकांनी सदरील निर्णयास पाठींबा दर्शविनेसाठी आणि आपला विरोध प्रदर्शन करनेसाठी 23/8/21 तारखेला एक दिवसासाठी आपले व्यवसाय बंद ठेवायची आहेत , याची सर्व सराफ बांधवानी नोंद घ्यायची आहे असे आव्हान महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी केले आहे.

       काही व्यापारी बांधव हे आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी अफवांवर विश्वास ठेवू नये. मीटिंगमध्ये संपूर्ण भारत बंदला पाठिंबा असून तसे पाठिंब्याचे पत्र दिले आहे अशी माहिती पंढरपूर असोसिएशनचे अध्यक्ष महावीर गांधी यांनी दिली.

 यावेळी पंढरपूर असोसिएशनचे सचिव भगवंत बहिरट यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: