विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घेतले मानाच्या गणपतीचे दर्शन…
उपसभापती नीलम गोऱ्हे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

पुणे, दि.२८ : पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील वसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी हजारो गणेश भक्त येत असतात.
आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौकातून सुरुवात झाली. मानाचा पहिला कसबा गणपतीची उपसभापती नीलम गोऱ्हे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.