लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी तर्फे जागतिक उद्योजकता दिन आणि ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी तर्फे जागतिक उद्योजकता दिना निमित्त कार्यशाळेचे आयोजन व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार समारंभ Lions Club of Solapur Twin City celebrates World Entrepreneurship Day and Senior Citizens Day
सोलापूर - लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी तर्फे 21 ऑगस्ट जागतिक उद्योजकता दिवस निमित्त उद्योजकता कार्यशाळा व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक- मालेगाव येथील सुप्रसिद्ध उद्योजक कुंदन पवार व उपविभागीय सभापती MJF लायन खाजा भाई शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये अध्यक्ष नंदिनी जाधव यांनी ही कार्यशाळा घेण्या मागचे उद्देश स्पष्ट केले .

आपल्या अध्यक्षीय भाषणात कुंदन पवार यांनी
उद्योजकता म्हणजे फक्त एखादा व्यवसाय सुरु करणे नव्हे तर त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे बहुतेकांचं व्यवसायाप्रती असलेलं आकर्षण हे त्यातील श्रीमंतीमुळे असतं,पण खऱ्या उद्योजकाला त्यातल्या पैशापेक्षा त्यातून मिळणाऱ्या समाधानाची जास्त आस असते असे म्हणत सध्याचे परिस्थितीत युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक होऊन इतरांना नोकरी द्यावी .

झोन चेअरमन खाजा भाई शेख यांनी उद्योजकता हे व्यसन आहे आणि हे व्यसन ज्याला जडतं त्याच आयुष्य एखाद्या पुस्तकासारखंच बनून जातं अगदी संग्रही ठेवावं असं आणि त्यातलं कोणतंही पान कधीही वाचायला सुरुवात केली तरी नेहमीच काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल असे सांगितले.

    सचिव इंजि.सागर पुकाळे यांनी स्वतःच्या विचाराने पुढे जाणे,आपले कौशल्य पणाला लावणे, धोका पत्करणे, अशक्य गोष्टींनाही शक्य करण्यासाठी प्रयत्न करणे, बहुतेकांसाठी ज्या गोष्टी स्वप्नातही शक्य नसतात त्या प्रत्यक्षात मिळवण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टींमधून उद्योजक घडत असतो असे सांगितले. 

    या कार्यक्रमानंतर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त ज्येष्ठ नागरीक म्हणून जुळे सोलापूर येथील चांद भाई शेख यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी उद्योजिका तृप्ती पवार, गणपती राठोड, लायन्स क्लब ट्विन सिटी चे मुकुंद जाधव, वैभव जाधव ,अनिरुद्ध होमकर यांच्यासह जुळे सोलापुरातील अनेक युवक युवती उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर्किटेक्ट यशोमती जाधव यांनी केले.आभार प्रदर्शन सागर पुकाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: