पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे बुरशी, जिवाणू,विषाणूंचा प्रादुर्भाव जास्त होतो त्याचा विपरीत परिणाम गुरांच्या आरोग्यावर होतो

धर्मपूरी येथे गोठा स्वछतेचे प्रात्यक्षिक

धर्मपूरी / ज्ञानप्रवाह न्यूज :- पावसाळ्यात वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो व त्याचा विपरीत परिणाम गुरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो असे मत कृषीदुत शेखर पठाडे,अनुप परदेशी, अनिकेत सरवदे,रोहन पाटील, ओंकार पाटेकर,प्राशिक नगराळे,विशाल पराडे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित, रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत धर्मपुरी ता.माळशिरस जि. सोलापूर येथे व्यक्त केले.

पावसाचे पाणी गोठ्यातील शेण, मुलमुत्र यामध्ये मिसळून गोठ्यात दुर्गंधी पसरते आणि जनावरे वेगवेगळ्या आजाराला बळी पडतात आणि त्याचा थेट परिणाम जनावराच्या दूध उत्पदनावर होतो आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. असे होऊ नये म्हणून गुरांच्या गोठ्याची स्वच्छता ही अत्यावश्यक असते. गोठ्याची स्वच्छता कश्या प्रकारे व वेळोवेळी केली पाहिजे तसेच निर्जंतुकीकरण करणे ही आवश्यक आहे असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले त्याकरिता त्यांना विषय शिक्षक प्रा.डी.एस.मेटकरी तसेच अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महावद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलवडे, समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर  आणि प्रा.एच.व्ही.कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यावेळी धर्मपूरी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: