शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक संजय घोडके यांचे निधन

पंढरपूर शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा माजी नगरसेवक संजय घोडके यांचे निधन

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,२९/०९/२०२३ – पंढरपूर शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा माजी नगरसेवक संजय घोडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे कट्टर शिवसैनिक हरपला आहे.

पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरातून शिवसेनेची शाखा स्थापन करून शिवसेना वाढीसाठी सतत झटणारे शिवसेनेच्या तिकिटावरून याच भागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले संजय घोडके हे जेवढे आक्रमक होते तेवढेच जीवाला जीव देणारे होते.

शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होऊनही कोणत्याही दबावाला अथवा अमिषाला बळी न पडता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता.आपल्या प्रमाणेच अनेक कट्टर शिवसैनिक तयार करून शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने केली होती. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे संजय घोडके यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: