जर खरच श्रीमती देवरे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात कोणतेही तथ्य नसेल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी – ना.डॉ.नीलम गोऱ्हे

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेतली ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट

श्रीमती देवरे यांना सुरक्षा पुरविण्याचे डॉ.गोऱ्हे यांचे स्थानिक प्रशासनास सूचना Parner Tehsildar Jyoti Deore called on Dr. Neelam Gorhe

पुणे/नगर : नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार यांनी काही दिवसांपूर्वी ऑडिओच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनांतील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबाबत वाचा फोडली होती. यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र देऊन महिला सचिवांच्या मार्फत चौकशी करण्याची सूचना केली होती. डॉ.गोऱ्हे ह्या महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे सतत उभ्या असतात यातूनच श्रीमती देवरे यांच्या पाठीमागे उभ्या आहेत. डॉ.गोऱ्हे यांनी केलेल्या मदतीबद्दल श्रीमती देवरे यांनी दि.२१ ऑगस्ट,२०२१ रोजी उशीरा डॉ.गोऱ्हे यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी शिवसेना नगर संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.

     या दरम्यान स्वतःवर होणार त्रासाचा पाढा वाचताना श्रीमती देवरे ह्या भावुक झाल्या होत्या. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी त्यांना धीर दिला. 

जर खरच श्रीमती देवरे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात कोणतेही तथ्य नसेल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन दिले. तसेच कुणालाही कायद्याच्या नावे अधिकार्याना मारहाण छळणुक यांचा अधिकार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर श्रीमती देवरे आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी अशी सूचना देखील नगर स्थानिक प्रशासनाला केली आहे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: