कुरुल कामती जिल्हा परिषद गट बौद्ध समाजाच्या चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी दिला भावी आमदार राजू खरे यांना जाहीर पाठिंबा
मोहोळ जि.सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मोहोळ तालुक्यात मुंबई येथील उद्योजक राजू खरे यांना पाठींबा वाढत असून कुरुल, कामती जिल्हा परिषद गट, आणि बौध्द समाजातील चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी मोहोळ चे भावी आमदार म्हणून राजू खरे यांना पाठींबा दिला आहे.
मूळचे पंढरपूर येथील असणारे राजू खरे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून समाजसेवा आणि गरजूंसाठी भरीव योगदान देण्याची दानत दाखविली. युवकांना विविध माध्यमातून रोजगार,नोकरी, मार्गदर्शन,अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी खरे यांनी त्यांच्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे.

पंढरपूर येथे राजू खरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच कार्य ते आता मोहोळ तालुक्यात करीत असून सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेत त्यांच्या नावाचे एक विशेष आकर्षण निर्माण झाली आहे.
उपेक्षितांचा कैवारी, सर्वसामान्य जनतेचा तारणहार, आपल्या मातीतील माणूस अशी नवीन ओळख त्यांनी निर्माण केली आहे.रस्ते, वीज,पाणी या मूलभूत गरजा आहेत पण त्याहीपेक्षा सामाजिक व मानसिक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यावर खरे यांनी आपले लक्ष्य केंद्रित केले आहे.वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागेल ते प्रयत्न करण्याची त्यांची तयारी आहे. राज्यात अनेक ठिकाणी आजही लब्धप्रतिष्ठित लोकांकडून समाजावर अन्याय केला जातो. सामाजिक दरी निर्माण करून विनाकारण तेढ निर्माण केली जात आहे.अशा विघातक वृत्तीचा बीमोड करण्यासाठी राजू खरे यांच्यासारख्या नव्या आणि ताज्या दमाच्या लोकनेत्याची गरज असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

यावेळी प्रकाश पारवे मोहोळ,विधानसभा मतदार संघ अध्यक्ष सुधीर गोरे शिवसेना ता.प्रमुख उत्तर सोलापूर मा. दादा साहेब पवार शिवसेना सोलापूर जि उप प्रमुख दादासाहेब करणावर माजी जि.प. सदस्य नरखेड, समाधान खंदारे शिवसेना नरखेड गट,उमाकांत करडे सोलापूर शिवसेना उपप्रमुख, अमर सोनवले शिवसेना तालुक उप प्रमुख मोहोळ शिंदे गट, लक्ष्मण राठोड सरपंच सेवालाल नगर मार्डी विभाग प्रमुख शिवसेना , सागर पवार (माजी गट प्रमुख शिवसेना नरखेड , समर्थ बिराजदार युवा सेना सचिव सोलापूर शहर,शहाजी केदार ग्रामपंचायत सदस्य कोठळी, सतीश जाधव शिवसेना शाखा प्रमुख यनकी,विक्रम कीर्त युवा नेते कोरोली,महादेव माने वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मोहोळ, संजय कांबळे ग्रामपंचायत सदस्य जामगाव, समाधान सोनवले हरबळी, माळाप्पा कांबळे येनकी, विश्वास गायकवाड रिपब्लिकन सचिव ,चिगोली गौतम तूपलोडे अध्यक्ष मानव परिवर्तन संस्था कोरोली, शांताराम सोनवले बहुजन पार्टी अध्यक्ष सोहळे, महादेव ऐवळे, शहाजी कीर्त भ्रष्टाचार विरोध समिती तालुका अध्यक्ष मोहोळ, शंकर माने कैकाडी समाज अध्यक्ष बेगमपूर ,आदित्य भोई भोई समाज अध्यक्ष बेगमपूर, राहुल अलदर धनगर समाज अध्यक्ष, अण्णा कीर्त कोरोली, राजेश चंदनशिवे सर विरांगणा बहुउद्देश सेवा संस्था अध्यक्ष,सोनू शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.